Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा* *जमीन हस्तांतरित करण्याचे...

कोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा* *जमीन हस्तांतरित करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे परिवहन विभागाला निर्देश*

*

मुंबई दि.१९ :- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे मंजूर असलेल्या, मात्र जागेअभावी प्रलंबित राहिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष बैठकीत यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कोरेगाव भीमा येथील ६४ आर जमीन उपलब्ध असून, जागेच्या नियोजनाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. परिवहन विभागाने रस्त्याच्या कडेला व्यावसायिक कारणासाठी आवश्यक असलेली जागा विकसित करावी आणि उर्वरित उपलब्ध जागा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेकडे तात्काळ हस्तांतरित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून जागेअभावी रखडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्यक्ष सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला असून, कोरेगाव भीमा व परिसरातील नागरिकांना लवकरच उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या बैठकीस आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी,जिल्हा परिषद सदस्य मोनिका हरगुडे,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे),पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments