Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedरंगलेल्या गालाचा मुका..नाटक * *विशेष पुरस्काराने सन्मानित* *डॉ. विजय...

रंगलेल्या गालाचा मुका..नाटक * *विशेष पुरस्काराने सन्मानित* *डॉ. विजय देशमुख यांचा जागतिक सन्मान*

*
मुंबई दि.22:-कामाक्षी क्रिएटिव्ह मुंबई आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावर मराठी नाट्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या “रंगलेल्या गालाचा मुका “या नाटकाला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
जगभरातून १२८ संहितांमधून या नाटकाची निवड करण्यात आली त्यामुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे .यापूर्वीही त्यांनी लिहिलेल्या पाचही प्रकाशित पुस्तकांना महाराष्ट्रातील प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरातील साळगावकर सभागृहात संपन्न झाला .याप्रसंगी प्रसिद्ध कलावंत प्रदीप कबरे व नुकताच ज्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला ते सुप्रसिद्ध अभिनेते प्रमोद पवार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. जागतिक स्तरावर मराठी नाटकांची विशेषतः नाट्यलेखनाची अशी स्पर्धा उल्लेखनीय म्हणावी लागेल त्यात पहिल्याच वर्षी डॉ .विजयकुमार देशमुख यांनी हा पुरस्कार पटकावला. वेगळ्या आकृतिबंधाची ही कलाकृती जेव्हा अशा पुरस्काराने सन्मानित होते त्यावेळी नव्या वाटा रंगभूमीवर धुंडाळणाऱ्या रंगकर्मींची उमेद वाढते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
……

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments