क्रिसाला लँड ऑफ ड्रीम्सच्या परिसरात उभारले जाणारे १.५ एकरातील हे मंदिर पुण्यातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या निवासी पट्यात अध्यात्मिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांची भर घालण्यासाठी सज्ज
पुणे, ऑगस्ट 25, २०२६: क्रिसाला डेव्हलपर्स या पुणे आणि पीसीएमसी क्षेत्रातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरने आपल्या लँड ऑफ ड्रीम्स या प्रमुख टाउनशिपच्या शेजारी अंदाजे १.५ एकर जागेवर स्वामी नारायण मंदिरासह एका महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक गंतव्याचे स्वागत करण्याची तयारी केली आहे. हे प्रस्तावित मंदिर पुण्यात एवढ्या मोठ्या निवासी प्रकल्पाच्या इतक्या जवळ असणारे पहिले स्वामी नारायण मंदिर ठरण्याची शक्यता आहे.
पुण्यातील सर्वात वेगाने उदयास येणारा निवासी आणि पायाभूत सुविधांचा पट्टा वडगाव-लोणावळा ग्रोथ कॉरिडॉरमध्ये क्रिसाला लँड ऑफ ड्रीम्स प्रकल्प वसलेला आहे. हा भाग वेगाने विकसित होत असून येथे निवासी व पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार होत आहे. हे प्रस्तावित मंदिर या कॉरिडॉरला एक विशिष्ट अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख मिळवून देईल, ज्यामुळे येथील वाढत्या निवासी परिसंस्थेला जोड मिळून एका अधिक एकात्मिक समुदाय क्षेत्राचा उदय होण्यास मदत होईल.
क्रिसाला डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. आकाश अग्रवाल म्हणाले, “लँड ऑफ ड्रीम्समध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी टाउनशिपच्या आत स्वामी नारायण मंदिर असणे ही अशा गोष्टीची भर करते, जी केवळ निवासी सुविधांद्वारे निर्माण करता येत नाही. हे रहिवाशांना घराच्या जवळ एक श्रद्धेचे ठिकाण देते, जिथे ते दूरचा प्रवास न करता जवळच असलेल्या मंदिरामध्ये प्रार्थना करू शकतात, सण साजरे करू शकतात आणि सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात. क्रिसाला लँड ऑफ ड्रीम्समधील राहण्याच्या दैनंदिन अनुभवामध्ये ही एक महत्त्वाची भर आहे, विशेषतः अशा कुटुंबांसाठी, जे या परंपरा आणि सामाजिक ठिकाण सहज उपलब्ध असण्याला महत्त्व देतात.”
हे मंदिर सध्या नियोजन आणि विकास टप्प्यात आहे, बांधकामाचा कालावधी मंदिर ट्रस्टद्वारे योग्य वेळी निश्चित केली जाईल. बांधकाम पूर्ण झाल्यावर येथे नियमित धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे या कॉरिडॉरच्या विकसित होणाऱ्या सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये भर पडेल.
पुण्यामधील पश्चिम आणि नैऋत्य भागातील ग्रोथ कॉरिडॉरमध्ये सातत्याने निवासी मागणी दिसून येत आहे. अशा स्थितीत या मंदिरासारख्या संस्थांची भर पडल्याने वडगाव-लोणावळा पट्याचे दीर्घकालीन महत्त्व अधिक अधोरेखित होईल. ज्यामुळे याचे एका परिघावरील ठिकाणावरून स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण मायक्रो-मार्केटमध्ये रूपांतर होण्यास पाठबळ मिळेल.


