Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedसप्टेंबरमध्ये पक्की अनुज्ञप्तीबाबत शिबिर दौऱ्यांचे आयोजन*

सप्टेंबरमध्ये पक्की अनुज्ञप्तीबाबत शिबिर दौऱ्यांचे आयोजन*

*

पुणे, दि. २५: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या वतीने सप्टेंबर २०२६ महिन्यासाठी पक्की अनुज्ञप्तीबाबत शिबिर दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना पक्की अनुज्ञप्तीविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी हे शिबिर दौरे आयोजित करण्यात आले आहेत.
यानुसार खेड येथे १, २ व ३ सप्टेंबर, मंचर येथे ७, ८ व ९ सप्टेंबर, जुन्नर येथे १५, १६ व १७ सप्टेंबर, वडगाव मावळ येथे २१, २२ व २३ सप्टेंबर, तर लोणावळा येथे २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांचा लाभ संबंधित नागरिकांनी घ्यावा, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments