Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंतोष जगताप यांना औद्योगिक अभियांत्रिकी सुरक्षा क्षेत्रात डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सत्कार

संतोष जगताप यांना औद्योगिक अभियांत्रिकी सुरक्षा क्षेत्रात डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सत्कार

नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनचे माजी विद्यार्थी आणि गोदरेज प्राॅपर्टीज लिमिटेडचे जनरल मॅनेजर संतोष जगताप यांना जी. डी गोएंका युनिव्हर्सिटी कडून औद्योगिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा अभियांत्रिकी सुरक्षा क्षेत्रात डाॅक्टरेट मिळविल्याबद्दल नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या देशविदेशातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संमेलनात संस्थेचे माजी अध्यक्ष डाॅ. दिलीप देशपांडे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विद्यमान अध्यक्ष क्षीरसागर, डॉ.अमित पाटील, अमोल काशीद तसेच देशविदेशातील विविध औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.

डाॅ. दिलीप देशपांडे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून कारखान्यात कायदा व सुरक्षा व्यवस्था अंमलात आणत असतांना कामगारांचे मत विचारात घेऊन कायदे राबविल्यास कामगारांचे संपूर्ण सहकार्य मिळते व अपघात टाळण्यास मदत होते असे सांगितले.

सत्काराला उत्तर देतांना संतोष जगताप यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे व आपल्या गुरूजनांचे असून सुरक्षेबाबत अजून खूप कांही शिकायचे आहे व अनेक कर्तबगार सुरक्षा अधिकारी निर्माण करायचे आहेत असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन अमोल काशीद आणि सहकाऱ्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments