1 सप्टेंबर 2026, मुंबई: यूटीआय म्युच्युअल फंड (UTI MF) ने दोन नवीन पॅसिव्ह फंड्स सादर केले आहेत – यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स एक्सचेंज ट्रेडेड फंड’ (बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स टोटल रिटर्न्स इंडेक्स (TRI) चे अनुकरण करणारी ओपन-एंडेड योजना) आणि यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड (बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स टोटल रिटर्न्स इंडेक्स (TRI) चे अनुकरण करणारी ओपन-एंडेड योजना). या दोन्ही नवीन पॅसिव्ह फंड्ससाठी एनएफओ (NFO) 31 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत खुला असेल. यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या लाँचसह, यूटीआय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्सचा मागोवा घेणारा उद्योगातील पहिला ईटीएफ (ETF) घेऊन आला आहे.
यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड यांच्याबद्दल:
यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड ही पॅसिव्हली मॅनेज्ड गुंतवणूक उत्पादने आहेत. ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून, बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स टोटल रिटर्न्स इंडेक्स (TRI) च्या कामगिरीप्रमाणे परफॉर्म करणे हे या योजनांचे उद्दिष्ट आहे. तथापि, या योजनांचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईलच याची कोणतीही हमी नाही. ही दोन्ही उत्पादने गुंतवणूकदारांना ‘BSE500 TRI’ मधील संबंधित क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये, नियमांवर आधारित गुंतवणूक पद्धतीद्वारे गुंतवणूक करण्याची संधी देतात.
या दोन्ही उत्पादनांचा आधारभूत निर्देशांक असलेला बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स हा आर्थिक सेवा, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, तेल आणि वायू इत्यादी क्षेत्रांमधील आघाडीच्या कंपन्यांच्या केंद्रित पोर्टफोलिओद्वारे त्या-त्या क्षेत्रातील नेतृत्व दर्शवणाऱ्या व्यवसायांमध्ये सहभागी होण्याची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देतो.
यूटीआय एएमसीचे (UTI AMC) पॅसिव्ह, आर्बिट्राज आणि क्वांट स्ट्रॅटेजीज विभागाचे प्रमुख श्री. शरवण कुमार गोयल म्हणाले:
“बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स एक वैशिष्ट्यपूर्ण गुंतवणूक तत्त्वज्ञान दर्शवतो, जे केवळ सर्वात मोठ्या क्षेत्रांपुरते मर्यादित न राहता, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सर्व स्तरातील नेतृत्वाला सामावून घेते. याची पारदर्शक, नियमांवर आधारित कार्यपद्धती, पोर्टफोलिओची रचना आणि सिक्युरिटी निवडीसाठीच्या शिस्तबद्ध दृष्टिकोनाच्या आधारे, विविध क्षेत्रातील आघाडीच्या व्यवसायांमध्ये वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध करून देते. यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड आणि यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स एक्सचेंज ट्रेडेड फंड हे दोन पॅसिव्ह गुंतवणूक साधनांच्या माध्यमातून याच तत्त्वज्ञानाचा विस्तार करतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना एका पद्धतशीर आणि सुस्पष्ट चौकटीद्वारे या क्षेत्रातील आघाडीच्या व्यवसायांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळते.”
प्रस्तावित नवीन फंडांची प्रमुख वैशिष्ट्ये:
यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स एक्सचेंज ट्रेडेड फंड
यूटीआय बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड
एनएफओ कालावधी
सोमवार, 31 ऑगस्ट 2026 ते शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026
फंड व्यवस्थापक
श्री. शरवण कुमार गोयल (फंड व्यवस्थापक),
श्री. आयुष जैन (सहाय्यक फंड व्यवस्थापक), श्री. लोकेश कुलथिया (सहाय्यक फंड व्यवस्थापक)
बेंचमार्क
बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स टीआरआय
NFO* दरम्यान किमान गुंतवणूक
प्रारंभिक गुंतवणुकीची किमान रक्कम 5,000 रुपये आहे आणि त्यानंतर ती 1 रुपयाच्या पटीत असावी.
किमान प्रारंभिक गुंतवणूक 1,000 रुपये आहे आणि त्यानंतर ती 1 रुपयाच्या पटीत असावी.
फोलिओअंतर्गत त्यानंतरच्या गुंतवणुकीची किमान रक्कम 1,000 रुपये आहे आणि ती 1 रुपयाच्या पटीत असावी; यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.
योजना आणि पर्याय
ही योजना गुंतवणुकीसाठी कोणतेही प्लॅन्स किंवा पर्याय उपलब्ध करून देत नाही.
ही योजना केवळ ग्रोथ ऑप्शन उपलब्ध करून देते.
रेग्युलर प्लॅन आणि डायरेक्ट प्लॅन – केवळ ग्रोथ पर्याय उपलब्ध
लोड संरचना
प्रवेश लोड: लागू नाही
एक्झिट लोड: शून्य
*लागू असलेले मुद्रांक शुल्क आणि व्यवहार शुल्क (असल्यास) वजा केल्यानंतरच युनिट्सचे वाटप केले जाईल.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन आहे; योजनेशी संबंधित सर्व
कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


