Thursday, September 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातून ‘डेंग्यूमुक्त भारत’ अभियानाला सुरुवात; ओडोमॉस कडून दिवसा डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी जनजागृतीला...

पुण्यातून ‘डेंग्यूमुक्त भारत’ अभियानाला सुरुवात; ओडोमॉस कडून दिवसा डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी जनजागृतीला चालना

 

 

पुणे, ०3 सप्टेंबर २०२६: भारतातील क्रमांक एक वैयक्तिक वापरासाठीचे डास प्रतिबंधक उत्पादन असलेल्या ओडोमॉसने ‘डेंग्यूमुक्त भारत’ या देशव्यापी जनजागृती अभियानाची सुरुवात केली. नागरिकांमध्ये डेंग्यूपासून बचावाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच दिवसा डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांपासून संरक्षण घेण्याची गरज अधोरेखित करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

 

 

शाळांमधील जनजागृती कार्यक्रम आणि समुदाय सहभागाच्या उपक्रमांद्वारे पावसाळ्याच्या काळात दररोज डासांपासून संरक्षण घेण्या बाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.

डासांमुळे पसरणाऱ्या आजारांपासून बचावाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगीकारण्यास प्रोत्साहन देणे, हा ओडोमॉसच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे. ग्राहक शिक्षण आणि समुदाय जनजागृती कार्यक्रमांद्वारे कुटुंबांना डेंग्यू, मलेरिया आणि इतर डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांपासून सुरक्षित राहण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट ब्रँडने ठेवले आहे.

 

या अभियानांतर्गत संपूर्ण भारतातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार असून, जनजागृती सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला जाणार आहे. डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांपासून प्रभावी संरक्षण कसे मिळवावे, याबाबत त्यांना माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला.

 

यावेळी सोसायटीमध्ये डॉ. श्रुती साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली

 

आणि देशसेवा फाऊंडेशन च्या मदतीने जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात ३०० हून अधिक नागरिक आणि मुलांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे नेतृत्व प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. श्रुती भीमराव साळवे यांनी केले. ह्यावेळी डॉ. श्रुती साळवे, डाबर इंडिया लिमिटेड चे दिनेश कुमार, देशसेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत बोलताना डाबर इंडिया लिमिटेडचे होम केअर विभागाचे विपणन प्रमुख वैभव राठी म्हणाले: “डेंग्यूचा आजार आजही संपूर्ण भारता समोरील एक गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. मात्र, डेंग्यूचा प्रसार करणारे डास दिवसा सक्रिय असतात, याबाबतची जनजागृती अजूनही मर्यादित आहे. भारतातील आघाडीचा वैयक्तिक वापरासाठीचा डास प्रतिबंधक ब्रँड म्हणून ओडोमॉसने कुटुंबांना डासांमुळे पसरणाऱ्या आजारांपासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ‘डेंग्यूमुक्त भारत’ अभियानाच्या माध्यमातून आम्ही उत्पादनाच्या संरक्षणा पलीकडे जाऊन सार्वजनिक जनजागृती साठीही आमची बांधिलकी अधिक व्यापक करत आहोत. कुटुंबांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगीकाराव्यात आणि पावसाळ्यात डासांपासून संरक्षण घेणेही दररोजची सवय बनवावी, यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत.”

 

जनजागृती शिबिराला संबोधित करताना डॉ. श्रुती साळवे म्हणाल्या: “डेंग्यूचा प्रतिबंध जनजागृती आणि सातत्यपूर्ण संरक्षणापासून सुरू होतो. एडीस इजिप्ती हा डास दिवसा चावतो. त्यामुळे घराबाहेर असतानाच नव्हे, तर प्रवास करताना, शाळेत जाताना किंवा सार्वजनिक ठिकाणी वेळ घालवतानाही नागरिकांना डेंग्यूचा धोका असतो. ‘डेंग्यूमुक्तभारत’ सारखे उपक्रम समुदायांमध्ये जनजागृती निर्माण करण्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात.”

 

डाबर इंडिया लिमिटेडचे विपणन विभागाचे महाव्यवस्थापक अमित गर्ग म्हणाले: “डासांपासून संरक्षणाबाबतची एक मोठी गैरसमजूत म्हणजे डासांपासून संरक्षणाची गरज फक्त रात्रीच असते. प्रत्यक्षात डेंग्यूचा प्रसार करणारे डास दिवसा सक्रिय असतात. त्यामुळे कामासाठी प्रवास करताना, शाळेत जाताना, बाहेर व्यायाम करताना किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना नागरिकांना डासांचा धोका असतो.

 

‘डेंग्यूमुक्त भारत’ अभियानाच्या माध्यमातून आम्ही दररोज डासांपासून संरक्षण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहोत. त्याचबरोबर ग्राहकांनी डासांपासून संरक्षण घेणे ही दैनंदिन सवय बनवावी, यासाठी प्रोत्साहन देत भारताला दीर्घकालीन स्वरूपात डेंग्यूमुक्त करण्याच्या आमच्या उद्देशाला पुढे नेत आहोत.”

 

ओडोमॉस तर्फे त्वचेसाठी अनुकूल अशा विविध प्रकारांमध्ये डासांपासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये क्रीम, लोशन, जेल, स्प्रेआणि फॅब्रिक रोल-ऑन यांचा समावेश असून, ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्रसंगांनुसार डासांपासून संरक्षण घेणे अधिक सोयीचे बनवण्यात आले आहे. आघाडीच्या बालरोगतज्ज्ञांनी केलेल्या चाचण्यांमध्ये डाबर ओडोमॉस लहान बाळे आणि मुलांसाठी वापरण्यास सुरक्षित असल्याचे प्रमाणित

करण्यात आले आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments