Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले 'दगडूशेठ'...

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन* 

 

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे स्वागत व सन्मान

 

पुणे : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.

 

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते. ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत करीत यथोचित सन्मान केला.

 

ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावे आणि पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे, असा संकल्प करीत गणरायाचरणी मान्यवरांनी प्रार्थना केली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments