Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महापालिकेकडून वाघेश्वर घाट परिसराचे सुशोभीकरण....    ...

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वाघेश्वर घाट परिसराचे सुशोभीकरण….     टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरातून सार्वजनिक जागेला आकर्षक स्वरूप… 

 

 

 

 

पिंपरी: २१ सप्टेंबर २०२६: स्वच्छतेची सवय आणि सौंदर्यदृष्टीची जोड मिळाल्यास सार्वजनिक परिसराचे रूप पालटू शकते, याचा प्रत्यय वाघेश्वर घाट परिसरात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधील साठे नगर, चऱ्होली बु. येथील वाघेश्वर घाट परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला.

 

 

 

“सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, स्वच्छता उपक्रमात नागरिकांचा सक्रीय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.

 

स्वच्छतेसोबतच उपलब्ध जागांचे सुशोभीकरण आणि टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील पुनर्वापर केल्यास परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलू शकतो. स्वच्छ, सुंदर पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

 

 

स्वच्छता (लक्ष्य क्षेत्रांतर्गत) परिसरातील रस्त्यालगत तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यात आली. उपलब्ध सार्वजनिक जागेची स्वच्छता करून तिचे सुशोभीकरण करण्यात आले. नागरिकांनी वापरात नसलेल्या तसेच टाकून दिलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली. या वस्तूंचा कलात्मक वापर करून परिसराला आकर्षक स्वरूप देण्यात आले.

 

 

 

“‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयीची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या सवयी नागरिकांनी अंगीकारणे आवश्यक आहे. नागरिक, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या सहभागातून स्वच्छतेची ही चळवळ अधिक व्यापक होईल,” असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

स्वच्छतेसोबतच सार्वजनिक जागेच्या सौंदर्यीकरणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे परिसराचे रूप पालटले. टाकाऊ वस्तूंचाही कल्पकतेने पुनर्वापर करून सार्वजनिक जागा अधिक आकर्षक करता येते, याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

 

 

यावेळी नागरिकांना ओला व सुका, सॅनिटरी, विशेष काळजी योग्य कचरा स्वतंत्रपणे संकलित करून महापालिकेच्या घंटागाडीतच देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून क

रण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments