टाटा.कार्सने लाँन्च केली टाटा सिएरा लेजंड सिरीज
मुंबई, सप्टेंबर २१ , २०२६: टाटा डाँट कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने आज टाटा सिएरा लेजंड सिरीजच्या लाँचची घोषणा केली. ही नवीन पाच व्हेरियंटची श्रेणी अधिक दर्जेदार आणि आलिशान सिएरा अनुभव वाढवते. ९९ लाख रुपये या सुरुवातीच्या किमतीमध्ये दाखल करण्यात आलेली लेजंड सिरीज अधिक अत्याधुनिक केबिन अनुभव, अधिक आरामदायीपणा आणि बहुप्रतिक्षित सुविधा वैशिष्ट्यांसह आपल्या ‘लाइफस्पेस ऑन द गो’ तत्त्वज्ञानाला समृद्ध करत सिएराचे प्रीमियम मिड-एसयूव्ही स्थान अधिक दृढ करते. सिएराची ओळख बनलेली प्रतिष्ठित डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रभावी एसयूव्ही कार्यक्षमता यात कायम ठेवण्यात आली आहे.
लेजंड सिरीजचा भाग म्हणून, प्युअर एल सिएराचा प्रीमियम केबिन अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सुलभ बनवते. १३.७९ लाख रुपये* किंमत असलेली ही व्हेरियंट १७-इंच अलॉय व्हील्ससह सिएराच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनला अधिक आकर्षक बनवते; तर प्रीमियम लेदरेट इंटिरिअर्ससह ८-स्पीकर ऑडिओ सिस्टीम आणि २६.०३ सेमी एचडी इन्फोटेनमेंट सिस्टीम केबिनमध्ये अधिक अत्याधुनिक वातावरण निर्माण करतात. अतिरिक्त ५०,००० रुपयांमध्ये, प्युअर एल (ओ) सेगमेंटमधील सर्वात मोठ्या पॅनारोमॅक्स व्हॉइस असिस्टेड सनरूफसह खुल्या हवेतील लक्झरीचा अनुभव देते.
आणखी आलिशान केबिन अनुभवाच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी, १४.९९ लाख रुपये* किंमत असलेली प्युअर+ एल हवेशीर फ्रंट सीट्स, थाय सपोर्ट एक्स्टेंडरसह ६-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि बॉस मोडची सुविधा देते. या सुधारणा प्रवाशांचा आराम आणि सोसीयुविधा नव्या उंचीवर नेतात.
या सुधारणांशिवाय, प्रत्येक सिएरा सर्वोत्तम वैशिष्ट्ये सातत्याने प्रदान करत आहे, ज्यांनी या एसयूव्हीला प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात आकर्षक पर्याय बनवले आहे. ५-स्टार भारत एनसीएपी प्रमाणित बॉडी स्ट्रक्चरवर निर्मित या एसयूव्हीमध्ये प्रमाणित म्हणून ६ एअरबॅग्ज, २० फंक्शन्ससह ईएसपी आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आहेत. ग्राहक तीन पॉवरट्रेन पर्यायांमधून निवड करू शकतात: १.५ लिटर हायपेरियन टीजीडीआय पेट्रोल, १.५ लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल आणि १.५ लिटर क्रायोजेट डिझेल, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्समध्ये उपलब्ध आहेत.
एक्स-शोरूम किमती लाख रुपयांमध्ये:
व्हेरियंट
मॅन्युअल
ऑटोमॅटिक
रेव्होट्रॉन १.५ लिटर
क्रायोजेट १.५ लिटर
रेव्होट्रॉन १.५ लिटर
क्रायोजेट १.५ लिटर
हायपेरियन १.५ लिटर
स्मार्ट + एल
११.९९
१३.४९
प्युअर एल
१३.७९
१५.२४
१४.९९
प्युअल एल (ओ)
१४.२९
१५.७४
१५.५९
१६.९९
प्युअर + एल
१४.९९
१६.४४
१६.२९
१७.७४
अॅडव्हेंचर + एल
१६.९९
१८.१९
१८.२९
१९.४९
१८.९९
लेजंड सिरीजच्या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले:
“सिएराने प्रतिष्ठित डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, अद्वितीय सुरक्षितता, कार्यक्षमता आणि लक्झरीअस एसयूव्ही अनुभव एकत्र आणून प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटची स्थापना केली, ज्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. नवीन लेजंड सिरीजसह आम्ही सिएरा पोर्टफोलिओमधील अधिकाधिक ग्राहकांसाठी अधिक उत्साहवर्धक आणि आलिशान केबिन वातावरण उपलब्ध करून त्या यशाला पुढे नेत आहोत. ग्राहक सर्वाधिक महत्त्व देत असलेली वैशिष्ट्ये आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून आम्ही सिएराची मूळ वैशिष्ट्ये कायम राखत या एसयूव्हीला अधिक प्रासंगिक आणि सुलभ बनवत आहोत.”
टाटा सिएरा लेजंड सिरीज बाबत
टाटा सिएरा एस्केप चाओज, एस्केप लिमिट्स आणि एस्केप ऑर्डिनरी या तीन मुख्य स्तंभांवर डिझाइन करण्यात आली आहे. ही तिन्ही तत्त्वे एकत्रितपणे एैसपैस जागा व आराम, प्रगत कार्यक्षमता व तंत्रज्ञान, तसेच गर्दीतही उठून दिसणारी वेगळी डिझाइन यांचा अनोखा संगम घडवून आणतात, ज्यातून प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटची निर्मिती होते.
टाटा सिएरा लेजंड सिरीज याच पायावर अधिक भर देते, ज्यामध्ये ग्राहक सर्वाधिक पसंती देत असलेली अनेक आरामदायी आणि सोईस्कर वैशिष्ट्ये विविध व्हेरियंट्सच्या विस्तृत श्रेणीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रीमियम इंटिरिअर फिनिशिंग आणि सुधारित आसन व्यवस्थेपासून कनेक्टेड तंत्रज्ञान व दैनंदिन सोयीसुविधेच्या वैशिष्ट्यांपर्यंत ही लेजंड सिरीज अधिकाधिक ग्राहकांना सुरुवातीच्या व्हेरियंट्सपासून अधिक उत्साहवर्धक सिएरा मालकीचा अनुभव घेण्यास सक्षम बनवते.
महत्त्वाचे म्हणजे, सिएराचे मूळ तत्त्व (डीएनए) कायम ठेवण्यात आले आहे. प्रत्येक सिएरा एैसपैस जागा, सुरक्षितता, तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन सातत्याने देत राहते, जी या ब्रँडची मूळ ओळख आहे. लेजंड सिरीज केवळ अधिक उच्च दर्जाच्या केबिन वातावरणाची सुलभता वाढवते, ज्यामुळे संपूर्ण श्रेणीमध्ये सिएराची उपयुक्तता आणखी आकर्षक बनते.
स्मार्ट + एल: सहजसाध्य लक्झरी
लेजंड सिरीजची सुरुवात ११.९९ लाख रुपये* किमतीच्या स्मार्ट + एल व्हेरियंटने होते, जी सिएरा श्रेणीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अधिक उत्साहवर्धक केबिन वातावरण प्रदान करते. प्रत्येक सिएराची ओळख असलेली एैसपैस जागा, सुरक्षितता आणि एसयूव्ही वैशिष्ट्यांसोबत यात लेदरेट सीट्स, डोअर ट्रिम्स आणि आर्मरेस्ट्स, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, ऑटो-फोल्ड ओआरव्हीएम आणि पॅसिव्ह एन्ट्री अँड पॅसिव्ह स्टार्ट (पीईपीएस)चा समावेश करण्यात आला आहे. बाय-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि २० हून अधिक फंक्शन्ससह ईएसपी यांसारखी वैशिष्ट्ये या एसयूव्हीच्या दैनंदिन उपयुक्ततेला आणि सुरक्षिततेला अधिक पूरक ठरतात.
प्युअर एल, प्युअर एल (ओ) आणि प्युअर + एल: कनेक्टेड, ओपन-एअर आणि आलिशान लक्झरी
स्मार्ट + एल वर आधारित, प्युअर परसोना टप्प्याटप्प्याने सोयीसुविधा, कनेक्टिव्हिटी आणि केबिनमधील आराम अधिक वाढवते.
१३.७९ लाख रुपये* या आकर्षक किमतीत प्युअर एलमध्ये आठ-स्पीकर ऑडिओ सिस्टीमसह मोठी २६.०३ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो™ आणि अॅपल कारप्ले™, तसेच क्रूझ कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल आणि टीपीएमएसचा समावेश आहे. यात १७-इंच अलॉय व्हील्स आणि अतिरिक्त सोईस्कर वैशिष्ट्ये देखील सादर केली आहेत, जी मालकी अनुभवाला अधिक उत्साहवर्धक करतात.
केबिनमध्ये अधिक मोकळेपणाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी, १४.२९ लाख रुपये* किंमत असलेल्या प्युअर एल (ओ) व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि रेन-सेन्सिंग वायपर्ससह पॅनोरमॅक्स व्हॉइस-असिस्टेड पॅनोरामिक सनरूफ आहे.
१४.९९ लाख रुपये* किमतीत, प्युअर + एल आरामावर अधिक भर देते, ज्यामध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, थाय-सपोर्ट एक्स्टेंडरसह सिक्स-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि बॉस मोड यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. ड्युअल-झोन फुली ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मागील सीटवरील प्रवाशांसाठी ड्युअल ६५ वॅट यूएसबी-सी फास्ट चार्जर्स पुढील व मागील दोन्ही प्रवाशांचा आराम आणि सोयीसुविधा अधिक वाढवतात.
अॅडव्हेंचर + एल: क्षमतापूर्ण लक्झरी
१६.९९ लाख रुपये* किमतीत, अॅडव्हेंचर + एल तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि दैनंदिन सोयीवर अधिक भर देत सिएराच्या उपयुक्ततेचा विस्तार करते. यातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ४साईटसह ३६०° एचडी सराउंड व्ह्यू सिस्टीम, एफडीडीसह सुपरग्लाइड सस्पेंशन, विविध टेरेन मोड्स, ३१.२४ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि नेव्हिगेशनसह २६.०३ सेमी डिजिटल कॉकपिट यांचा समावेश आहे. फ्रंट पार्किंग सेन्सर्स, अॅम्बियंट लाइटिंग, टू-स्टेज रिक्लायनिंग रिअर सीट, वायरलेस चार्जर आणि कूल्ड
ग्लोव्हबॉक्स दैनंदिन सुलभता आणि आरामदायीपणा अधिक वाढवतात.
*एक्स-शोरूम


