Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedतुळशीबाग गणपतीतर्फे गणेशोत्सवात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव...

तुळशीबाग गणपतीतर्फे गणेशोत्सवात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

पुणे : गणेशोत्सवाबरोबरच समाजातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेत मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘एक दिवस महिलांचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांच्या कलागुणांसह सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘तुळशीबाग स्त्री सन्मान २०२६’ सोहळ्यात विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला.

 

श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडपात झालेल्या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मृणालिनी हेमंत रासने, नगरसेविका व पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या सदस्या स्वप्नाली नितीन पंडित, डॉ. शैलेश गुजर, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित आदी उपस्थित होते.

 

मेधा ताडपत्रीकर, शैलजा मिरजे, ॲड. रोहिणी पवार, ज्योती ढमाले, सुनंदा टिकार, महिमा ठोंबरे, स्वाती महाळंक आणि गुरमीत कौर गिल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सन्मानार्थींना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि तुळशीबाग गणपतीची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.

 

स्वप्नाली पंडित म्हणाल्या, गणेशोत्सवात महिलांसाठी एक दिवस समर्पित करून विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांच्या योगदानाची दखल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांच्या कार्याची ओळख समाजासमोर यावी आणि त्यांच्या योगदानाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘तुळशीबाग स्त्री सन्मान’ उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. माधुरी मिसाळ आणि मंजुषा नागपुरे यांनी मनोगत व्यक्त

केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments