Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोटकच्या मते, भारतातील गृहखरेदीदारांचे वय कमी होत आहे: जेन झी कर्जदारांमध्ये ८६...

कोटकच्या मते, भारतातील गृहखरेदीदारांचे वय कमी होत आहे: जेन झी कर्जदारांमध्ये ८६ टक्‍के वाढ

 

दीर्घकाळ भाड्याच्या घरात राहण्याची अपेक्षा असलेली पिढी आता वयाच्या ३० वर्षांपूर्वीच घरे खरेदी करत आहे

 

कोटक महिंद्रा बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतातील पहिले घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींचे वय दिवसेंदिवस कमी होत आहे, तसेच गृहकर्ज बाजारपेठेत जेन झी सर्वात वेगाने वाढणारा घटक म्हणून समोर येत आहे.

 

बँकेच्या आकडेवारीमधून निदर्शनास येते की, २५ ते ३० वयोगटातील गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या आर्थिक वर्ष २०२४ ते २०२६ दरम्यान ८६ टक्‍क्‍यांनी वाढून १,२३४ वरून २,२९० वर पोहोचली आहे. कोटकच्या वैयक्तिक गृहकर्ज ग्राहकांमध्ये जेन झी चा वाटा दोन वर्षांत ६ टक्‍क्‍यांवरून ९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे, म्हणजेच त्यांच्या सहभागात ५० टक्‍के वाढ झाली आहे. यामुळे ते बँकेच्या होम लोन बुकमधील सर्वात वेगाने वाढणारा तरुण ग्राहक वर्ग ठरले आहेत. याउलट, याच कालावधीत ३० ते ४५ वयोगटातील गृहकर्जदारांच्या संख्येत २६ टक्‍के वाढ नोंदवली गेली.

 

या ट्रेंडमधून निदर्शनास येते की, भारतातील तरुणांचा घरमालक होण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पूर्वीच्या पिढ्या ज्या टप्प्यावर आयुष्यात उशिरा पोहोचत होत्या, तो टप्पा आता खूप लवकर गाठला जात आहे.

 

अनेक वर्षांपासून अंदाज लावला जात होता की, जेन झी दीर्घकाळ भाड्याच्या घरात राहील, मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या घेणे टाळेल आणि स्थिरतेपेक्षा लवचिकतेला प्राधान्य देईल. पण आकडेवारीवरून स्पष्ट होते की, घराचा विचार येतो तेव्हा भारतातील अनेक तरुण अपेक्षेपेक्षा खूप आधीच दीर्घकालीन निर्णय घेत आहेत.

 

“भारतातील कुटुंबांमध्ये स्वतःचे घर असण्याला आजही विशेष स्थान आहे,” असे कोटक महिंद्रा बँकेचे गृहकर्ज विभागाचे प्रमुख नकुल सक्सेना म्हणाले. “लोकांचा हा निर्णय घेण्याचे वय आता बदलत आहे. पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टता आणि आत्मविश्वासाने तरुण कर्जदार बाजारपेठेत उतरताना दिसत आहेत.”

 

अनेक कुटुंबांमध्ये, ज्या वयात त्यांचे आई-वडील घरासाठी बचत करत होते, त्याच वयात आजचे तरुण प्रोफेशनल्‍स घरे खरेदी करत आहेत. काही केसेसमध्ये, मुले त्यांच्या स्वतःच्या कमाईतून आई-वडिलांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत आहेत. तर इतर केसेसमध्ये, पती-पत्नी दोघांचीही मिळकत असल्याने पूर्वीच्या पिढ्यांनी वर्षानुवर्षे लांबणीवर टाकलेले निर्णय आता वेगाने घेतले जात आहेत.

 

महामारीने घराच्या प्राधान्यक्रमांना नव्याने आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसते. घरात घालवलेल्या दीर्घ कालावधीमुळे अनेक तरुण कुटुंबांनी पुरेशी जागा, गोपनीयता, नैसर्गिक प्रकाश, बांधकामाचा दर्जा आणि कम्युनिटी लिव्हिंग यांना अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केली. घर हे आता केवळ राहण्याचे ठिकाण न राहता जगणे, काम करणे आणि भविष्य घडवण्याचे ठिकाण बनले आहे.

 

हा बदल मानसिकतेतील व्यापक परिवर्तनाला देखील सादर करतो. सर्व गोष्टी जुळून येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा अनेक तरुण खरेदीदार त्यांच्या आकांक्षा लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्याचा पर्याय निवडत आहेत. पूर्वीच्या पिढ्यांसाठी, करिअर आणि आर्थिक आघाडीवर अनेक वर्षांच्या प्रगतीनंतर घर घेणे शक्य होत असे. आज भारतातील अनेक तरुणांच्या मते, घर हे केवळ आर्थिक स्थिरता आल्यावरच खरेदी केले जात नाही, तर आयुष्यात स्थिरता निर्माण करण्यास मदत करणारे साधन आहे.

 

तसेच उच्च शिक्षण, करिअरमधील जलद प्रगती आणि उत्पन्नातील वाढ यामुळे भारतातील अनेक तरुणांना आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप लवकर स्वतःचे घर घेण्याचा टप्पा गाठण्यास मदत होत आहे.

 

“आम्हाला त्यांच्यात अधिक ठाम निश्चय दिसून येत आहे. पूर्णपणे स्थिरावण्याची वर्षानुवर्षे वाट पाहत बसण्यापेक्षा तरुण खरेदीदार आयुष्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा आत्मविश्वास दाखवत आहेत,” असे सक्सेना म्हणाले. “कोटकमध्ये आम्हाला त्यांच्या या प्रवासात पाठबळ देऊन त्यांचा निश्चय प्रत्यक्षात आणण्यास मदत करताना अभिमान वाटतो.”

 

हा बदल तरुण खरेदीदारांच्या गृहखरेदीच्या पद्धतीलाही नव्याने आकार देत आहे. एकाच वेळी मोठे आणि कायमस्वरूपी घर घेण्याची वाट बघत बसण्यापेक्षा, अनेक जण आपल्या सध्याच्या बजेट आणि जीवनशैलीला अनुरूप अशी घरे खरेदी करत आहेत. ते पहिल्या घराकडे भविष्यातील आर्थिक प्रगतीची पहिली पायरी म्हणून पाहत आहेत.

 

कोटकच्या मते, तरुण कर्जदारांच्या संख्येत झालेली ही वाढ भारतातील गृहनिर्माण बाजारपेठेमधील मोठ्या परिवर्तनाला निदर्शनास आणते.

 

जेन झी च्या वाढत्या समूहासाठी, हा त्यांनी घेतलेला पहिला प्रमुख आर्थिक निर्णय ठरत आहे. स्वतःचे घर असणे ही आजही मनापासून जपलेली मोठी आकांक्षा असली, तरी तरुण खरेदीदार आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करत आहेत. योग्य वेळेची किंवा परिपूर्ण क्षणाची वाट पाहत बसण्यापेक्षा अनेक जण लवकरात लवकर स्वत:चे घर खरेदी करण्याला पुढाकार देणे पसंत करत आहेत. ते स्थिरता निर्माण करण्याचा, दीर्घकालीन संपत्ती उभारण्याचा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा एक मार्ग म्हणून घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.

 

ज्या पिढीचा संबंध सहसा लवचिकता आणि सततच्या बदलांशी जोडला जातो, त्यांच्यासाठी स्वतःचे घर असणे हे सुरुवातीच्या काळातील स्थिरतेचे प्रतीक म्हणून पुढे येत आहे आणि विशेष म्हणजे, हा टप्पा अपेक्षे

पेक्षा खूप आधी गाठला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments