१५वे सावरकर संमेलन
भूतानच्या थिंपू या राजधानीत येत्या २ ऑक्टोंबर रोजी होत आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष
ज्येष्ठ लेखक सुधीर सेवेकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सावरकरांच्या पत्रकारितेचे अभ्यासक तथा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,संमेलनाचे निमंत्रक म्हणून भाऊ सुरडकर, कार्याध्यक्ष स्नेहल पाठक , भूतानच्या राज परिवारातील सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात सावरकरांच्या अनेक पैलूंवर लेख असलेल्या स्मरणिकेचे, देवेंद्र भुजबळ यांच्या “झेप” पुस्तकाचे,शैलजा देशपांडे यांचं “अनादि मी”, या पुस्तकांचे प्रकाशन देखील होणार आहे.
या संमेलनात विविध मान्यवरांची व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून संमेलनासाठी मुंबई,नवी मुंबई ,पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, पांढरकवडा, यवतमाळ, अमरावती, नांदेड,जळगाव, धुळे, चाळीसगाव, बीड अशा विविध ठिकाणावरून १३० सावरकर भक्त एकाच विमानाने प्रवास करणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाचे किरण सराफ, सुभाष कुमावत, विजय जहागीरदार यांचे मोठे योगदान या संमेलनासाठी लाभले आहे.
“पूर्व पिठीका”
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर गेल्या 30 वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संमेलनाचे आयोजन करीत आले आहे.या अगोदर छत्रपती संभाजीनगर, अंदमान, मॉरिशिस,श्रीलंका, लंडन, सिंगापूर, जपान, इंदोर, हम्पी,भगूर ,नाशिक, मेळघाट आदी ठिकाणी संमेलन झाले आहे.या सर्व संमेलनात स्थानिक लोकांचा मोठा सहभाग असतो.आपल्या भारताची संस्कृती, क्रांतिकारकांचे योगदान,भारतीय म्हणून आपली जबाबदारी असे विषय या संमेलनाच्या माध्यमातून मांडल्या जात असतात.


