पुणे: २२ सप्टेंबर २०२६
कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने तेलंगणा राज्यात हनमकोंडा वारांगळ व एल बी नगर हैदराबाद येथे दोन नवीन शाखा नुकत्याच सुरू केल्या. वारांगळ येथील शाखेचे उद्घाटन बँकेचे संचालक श्री अजित गिजरे यांनी केले. बँकेची ही १९४ वी शाखा आहे.
एल बी नगर हैदराबाद येथील १९५ व्या शाखेचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष श्री सचिन आपटे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी तेलंगणा राज्याचे पोलिस महासंचालक श्री महेश भागवत उपस्थित होते. नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री आपटे यांनी सांगितले की, तेलंगणा राज्यात आता बँकेच्या एकूण सात शाखा झाल्या आहेत. नजीकच्या काळात दक्षिण भारतात कॉसमॉस बँकेच्या शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होणार असून यामध्ये कोईमतूर, विशाखापट्टणम, विजयवाडा, हुबळी, चेन्नई, तिरुपुर यांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२६ अखेर बँकेच्या एकूण शाखा २०० करण्याचे नियोजन आहे. दक्षिण भारताप्रमाणेच कोकणातही बँकेच्या शाखा सुरू करणार असल्याची माहिती श्री आपटे यांनी यावेळी दिली.
नवीन शाखा उद्घाटनप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सीए डॉ. यशवंत कासार, ज्येष्ठ संचालक
ॲड प्रल्हाद कोकरे व व्यवस्थापकीय संचालिका सौ अपेक्षिता ठिपसे, तसेच दक्षिण विभागाचे उपमुख्य महाव्यवस्थापक श्री उमेश बेल्हे, इतर वरिष्ठ पदाधिकारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित हो
ते.


