Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorized*पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालये, विश्रामगृह परिसरात प्रचारास...

*पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालये, विश्रामगृह परिसरात प्रचारास बंदी*

 

 

पुणे, दि. ५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

 

या आदेशानुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तालुका दंडाधिकारी कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारात कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने, त्यांच्या प्रतिनिधीने अथवा हितचिंतकाने मिरवणूक काढणे, सभा घेणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे अथवा गाणी म्हणणे तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे, यास मनाई करण्यात आली आहे.

 

हा आदेश पुणे जिल्ह्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदीनुसार दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

 

निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व संबंधितांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments