Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण' - रविंद्र चव्हाण

सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’ – रविंद्र चव्हाण

 

 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या दुटप्पी राजकारणावर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोलकाता येथील व्हिडिओ शेअर करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार घणाघात केला. पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री बोलत होते.

 

रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण! ज्या राज्यांमध्ये तब्बल ४०-४० वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे त्यांच्याच मित्रपक्षांची सत्ता होती. व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी आणि काँग्रेस नेते याबद्दल तोंडातून ‘ब्र’ देखील काढणार नाहीत. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात ते हेच!’

 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात देशभरातील विविध राज्यांमध्ये किती वर्षांपासून काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही, याचा पाढा वाचला. ते म्हणाले की, ‘काँग्रेसने या पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी नेते झाल्यापासून देशातील नागरिक वेळोवेळी त्यांच्याविरोधात कौल देत आहेत आणि राहुलजींच्या नेतृत्वात ‘इंडिया आघाडी’ पुन्हा मोडण्यास सुरुवात झाली आहे.’

 

काँग्रेसच्या या अपयशावर बोट ठेवताना, रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा भाजपची भूमिका ठामपणे मांडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments