Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorized*महाराष्ट्राबाहेरील खासगी वाहनांच्या तपासणीसाठी परिवहन विभागाची विशेष मोहीम*

*महाराष्ट्राबाहेरील खासगी वाहनांच्या तपासणीसाठी परिवहन विभागाची विशेष मोहीम*

 

 

पुणे, दि. १३ : महाराष्ट्र राज्याबाहेर नोंदणीकृत असून महाराष्ट्रात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागामार्फत १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे वाहनांची नोंदणी, करभरणा आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे.

 

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ४७ अन्वये, एका राज्यात नोंदणीकृत वाहन दुसऱ्या राज्यात एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी वापरले जात असल्यास संबंधित राज्यात वाहनाची पुनर्नोंदणी करून विहित मोटार वाहन कर भरणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील तरतुदींनुसार आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

या पार्श्वभूमीवर पुणे शहर व परिसरात महाराष्ट्राबाहेरील नोंदणी क्रमांक असलेल्या आणि नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या खासगी वाहनांची विशेष तपासणी करण्यात आली असून ५ ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत केलेल्या कारवाईनुसार, १३४ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. ३७ वाहनांवर दोष आढळले आहेत. तीन वाहने अटकावून ठेवण्यात आली असून २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

 

पुणे शहरातील नागरिक व वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी, कर आणि इतर संबंधित कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. तसेच, परिवहन विभागाच्या तपासणीस आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments