Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदार यादी निरीक्षकांचा १६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हा दौरा* *मतदार नोंदणीसंदर्भातील...

मतदार यादी निरीक्षकांचा १६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हा दौरा* *मतदार नोंदणीसंदर्भातील तक्रारी दाखल करण्याचे आवाहन*

 

 

 

पुणे, दि. १५ (जिमाका, वृत्तसेवा) : दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी सुधारणांबाबत उपाययोजना सुचविणे व त्यासंदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, दावे निकाली काढण्याचा कालावधी आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीच्या वेळी अशा तीन टप्प्यांत मतदार यादी निरीक्षकांकडून पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादी निरीक्षक शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे जिल्ह्याला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान दुपारी ३.३० वाजता मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

 

 

मतदार नोंदणी आणि मतदार यादीसंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या तक्रारी व अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदार यादी निरीक्षकांच्या भेटीव्यतिरिक्त इतर कालावधीतही मतदार नोंदणीसंदर्भातील तक्रारी भारत निवडणूक आयोगाच्या NGRS पोर्टलवर तसेच जिल्हास्तरीय कॉल सेंटरच्या १९५० या दूरध्वनी क्रमांकावर नोंदविता येणार आहेत.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments