नवी दिल्ली, ऑक्टोबर २०२६: भारतातील आघाडीच्या कन्झ्युमर ड्युरेबल्स ब्रँड्सपैकी एक असलेल्या उषा इंटरनॅशनलने (Usha International) आपल्या प्रीमियम सीलिंग फॅन श्रेणीला नवे रूप दिले आहे. यासाठी कंपनीने उषा ब्लूम सिरीजमधील सहा आकर्षक फॅन्स सादर केले आहेत – उषा ब्लूम सनस्पायर ग्लो, उषा ब्लूम लिली ग्लो, उषा ब्लूम लिली नोव्हा, उषा ब्लूम डालिया, उषा ब्लूम प्लुमेरिया आणि उषा ब्लूम हेलेनियम. निसर्गाच्या सौंदर्यापासून प्रेरित ही श्रेणी आधुनिक घरांसाठी समकालीन सौंदर्य, ऊर्जा-कार्यक्षम परफॉर्मन्स आणि अधिक आराम एकत्र आणते.
आधुनिक इंटिरिअर्सना साजेशी अशी डिझाइन करण्यात आलेली ब्लूम सिरीज, फुलांपासून प्रेरित डिझाइन्ससोबत प्रगत BLDC तंत्रज्ञानाचा वापर करते. त्यामुळे केवळ ३४ वॅट इतक्या कमी वीज वापरात हे फॅन्स अतिशय शांतपणे आणि ऊर्जा-कार्यक्षमतेने चालतात. मॉडेलनुसार, हे फॅन्स ३५० RPM पर्यंतच्या वेगासह २२५ घनमीटर/मिनिटपर्यंत हवा दमदारपणे खेळती ठेवतात. रोजच्या वापरातील सोयीचा विचार करून या श्रेणीत धूळ व ओरखड्यांना प्रतिरोधक ब्लेड्स, ‘पॉइंट एनीव्हेअर’ RF रिमोट, स्मार्ट टॉगल रिकव्हरी आणि सेफ्टी वायर देण्यात आली आहे. निवडक मॉडेल्समध्ये बूस्ट (Boost) आणि स्लीप/टायमर मोड्सही उपलब्ध आहेत.
उषा ब्लूम सनस्पायर ग्लो आणि उषा ब्लूम लिली ग्लो मध्ये तीन लायटिंग मोड्स असलेले बिल्ट-इन LED अंडर लाइट्स आहेत, ज्यामुळे या श्रेणीला अॅम्बियंट लायटिंगची जोड मिळते. सूर्यफुलाच्या तेजस्वी उबदारपणापासून प्रेरित सनस्पायर ग्लो इंटिरिअरमध्ये उत्साही रंगत आणतो, तर लिली ग्लो अधिक डौलदार आणि शांत लुक देतो.
उषा ब्लूम लिली नोव्हा, डालिया, प्लुमेरिया आणि हेलेनियम हे दोन्ही दिशांनी फिरणारे (बायडायरेक्शनल), सर्व ऋतूंमध्ये वापरता येणारे फॅन्स आहेत. उन्हाळ्यात ते हवा अधिक चांगली खेळती ठेवण्यास मदत करतात, तर हिवाळ्यात उबदार हवा अधिक समान रीतीने पसरवतात. लिली नोव्हा श्रेणीत अधिक नियंत्रण आणि सोयीसाठी बूस्ट मोड आणि स्लीप/टायमर सेटिंग्ज यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
व्हाइट-लाइट ग्रीन, व्हाइट-सॅफ्रन यलो, व्हाइट-लाइट पिंक आणि व्हाइट-मिस्टी रोझ यांसारख्या आधुनिक रंगसंगतींमध्ये उपलब्ध असलेल्या ब्लूम सिरीजमुळे ग्राहकांना रोजच्या आरामासोबतच आपल्या घराला खास रंगत आणि वेगळे व्यक्तिमत्त्व देता येते.
उषा ब्लूम सिरीजची किंमत सर्व करांसह ₹७,१५२ ते ₹१०,२९६ दरम्यान आहे.
उषा ब्लूम लिली ग्लो – ₹१०,२९६
उषा ब्लूम सनस्पायर ग्लो – ₹९,४५०
उषा ब्लूम डालिया – ₹९,७०८
उषा ब्लूम हेलेनियम – ₹८,८८३
उषा ब्लूम लिली नोव्हा – ₹८,२४४
उषा ब्लूम प्लुमेरिया – ₹७,१५२
या लॉन्चच्या माध्यमातून उषा डिझाइन, नावीन्य आणि ऊर्जा-कार्यक्षमता यांचा मेळ घालण्यावरचा आपला भर अधिक मजबूत करत आहे. आधुनिक जीवनशैलीला साजेशी आणि घराला अधिक आराम व वेगळेपण देणारी उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
उषा होम अप्लायन्सेसबद्दल अधिक माहितीसाठी https://www.ushafans.com/
या वेबसाइटला भेट द्या.


