Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedटपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजन* *२२...

टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजन* *२२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. १९ : टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे विभागाच्या टपाल कार्यालय अधीक्षक कार्यालयामार्फत मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता टेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ही सभा शिवाजीनगर, पुणे येथील पुणे विभागाच्या टपाल कार्यालय अधीक्षक कार्यालयात होणार आहे.टपाल विभागातून निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनविषयक लाभांशी संबंधित, तसेच पुणे टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारकांच्या ज्या तक्रारी तीन महिन्यांच्या कालावधीत निकाली निघालेल्या नाहीत, अशा तक्रारींचाच यावेळी विचार करण्यात येणार आहे. या संदर्भातील तक्रारी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

 

निवृत्तिवेतनधारकांनी आपली तक्रार विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये वैयक्तिकरीत्या सादर करावी. तक्रार इतरांच्या वतीने किंवा सामूहिक स्वरूपात सादर करू नये. तक्रारीचा विहित नमुना पुणे विभागाच्या टपाल कार्यालय अधीक्षक कार्यालयातील विभागीय लेखापाल किंवा लघुलेखक यांच्याकडे उपलब्ध आहे. तसेच dopunemuffasil.mh@indiapost.gov.in या ई-मेल पत्त्यावरही तक्रार पाठविता येईल.

 

वारसाहक्कासह इतर निव्वळ कायदेशीर बाबी, वेतनवाढीशी संबंधित प्रकरणे, धोरणात्मक बाबींशी संबंधित शिस्तभंगाची प्रकरणे तसेच विभागीय पदोन्नती समितीच्या (डीपीसी) निर्णयाच्या पुनर्विलोकनासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे या सभेत विचारार्थ घेतली जाणार नाहीत, असे टपाल विभागाने कळविले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments