पुणे,२६ ऑक्टोबर २०२६ : असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) या संस्थेच्या औंध येथील वेस्ट अव्हेन्यू येथे नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्लास्टिक उद्योगाच्या विकासाला चालना देणे तसेच संस्थेच्या सदस्यांमधील समन्वय आणि सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नवीन कार्यालयाचे उद्घाटन अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक, चेअरमन अजय झोड, खजिनदार प्रणव बेल्हेकर, सचिव समीर कोठारी, माजी अध्यक्ष अरुण कुंभोजकर, राज मिरजे आणि अमित मेहता यांच्यासह संस्थेचे सदस्य आनंद कुंभोजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक म्हणाले, “या नवीन कार्यालयामुळे संस्थेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येण्यास मदत होईल. तसेच सदस्यांमधील संवाद, समन्वय आणि विविध उपक्रमांच्या नियोजनासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होईल. प्लास्टिक उद्योगाशी संबंधित विविध घटकांना एकत्र आणून उद्योगाच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न करण्यावर संस्थेचा भर राहणार आहे. याशिवाय, देशातील प्लास्टिक उद्योगाचे सर्वात मोठे प्रदर्शन असलेल्या व नोव्हेंबर 2027 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संस्थेच्या महत्त्वाकांक्षी ‘प्लास्टो’ प्रदर्शनाच्या नियोजन आणि समन्वयासाठीही हे कार्यालय उपयुक्त ठरणार
आहे.”


