व्हिजनस्प्रिंग फाउंडेशनसोबतची विस्तारित भागीदारी गुजरातमधील यशस्वी उपक्रमावर आधारित असून त्यातून अत्यावश्यक नेत्रसेवेची उपलब्धता सुधारेल आणि रस्ते
सुरक्षित होतील.
मुंबई, भारत– २ नोव्हेंबर २०२६: डीपी वर्ल्डचा शिपिंग सोल्युशन्स एएमईए व्यवसाय (“शिपिंग सोल्युशन्स”), व्हिजनस्प्रिंग फाउंडेशनसोबतची आपली भागीदारी विस्तारत आहे. त्यातून संपूर्ण भारतातील अंदाजे १२,००० व्यावसायिक चालक आणि वाहतूक कामगारांना मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे पुरवता येतील. यामुळे चालकांचे आरोग्य सुधारण्यास आणि देशाच्या व्यापारी मार्गांवर मालाची अधिक सुरक्षित वाहतूक करण्यास मदत होईल.
गुजरातमध्ये २०२५ साली आयोजित केलेल्या यशस्वी दृष्टी तपासणी शिबिरात ९,००० व्यावसायिक चालक आणि वाहतूक कामगारांची तपासणी करून ५,२०० हून अधिक प्रिस्क्रिप्शन चष्मे पुरवण्यात आले होते. तपासणी केलेल्या चालकांपैकी ६१% सहभागींमध्ये दृष्टीदोष असल्याचे निदान झाले. त्यासाठी नजर सुधारण्याची आवश्यकता होती, तर चष्मा मिळालेल्यांपैकी ९४% जण पहिल्यांदाच चष्मा वापरणारे होते. यावरून भारतातील वाहतूक क्षेत्रात सहज उपलब्ध होणाऱ्या नेत्रसेवेची मोठी गरज असल्याचे दिसून येते.
विस्तारित कार्यक्रमाचा शुभारंभ मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट येथे करण्यात आला असून, कोची, दिल्ली व कोलकाता येथे अतिरिक्त शिबिरे आयोजित करण्याची योजना आहे.
व्यावसायिक चालक दररोज बंदरे, उत्पादक, गोदामे आणि ग्राहकांना जोडतात. त्यामुळे ते भारताच्या लॉजिस्टिक्स नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनतात. तथापि, रस्त्यावरील दीर्घ प्रवासामुळे अनेकदा नियमित नेत्र तपासणी करणे कठीण होते. बंदरे, लॉजिस्टिक्स हब आणि वाहतूक केंद्रांवर थेट तपासणी उपलब्ध करून देऊन, हा कार्यक्रम चालकांना त्यांच्या कामात व्यत्यय न आणता आवश्यक नेत्रसेवा मिळवण्यास सक्षम करतो.
सहभागींना प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिकांकडून डोळ्यांची सर्वसमावेशक तपासणी मिळेल. दृष्टी सुधारण्याची आवश्यकता असलेल्यांसाठी प्रिस्क्रिप्शन चष्मा विनामूल्य दिला जाईल, तर मोतीबिंदू किंवा ग्लॉकोमा यांसारख्या आजारांची लक्षणे दिसणाऱ्या चालकांना पुढील निदान आणि उपचारांसाठी स्थानिक धर्मादाय किंवा सरकारी आरोग्यसेवा पुरवठादारांकडे पाठवले जाईल. या कार्यक्रमात डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे आणि दृष्टी कमी होण्याची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत यावर मार्गदर्शन देखील समाविष्ट आहे.
डीपी वर्ल्डचे शिपिंग सोल्युशन्स एएमईए विभागाचे प्रादेशिक संचालक, श्री. सी. एम. मुरलीधरन म्हणाले: “प्रत्येक मालवाहतूक ही वाहनाचालकांवर अवलंबून असते. व्यावसायिक चालक देशभरातील व्यवसाय आणि समुदायांशी आपल्या बंदरांना जोडतात आणि अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीत दीर्घकाळ काम करतात. या कार्यक्रमाचा विस्तार करून आम्ही नेत्रसेवेची उपलब्धता सुधारण्यास मदत करत आहोत, जेणेकरून चालक रस्त्यावर अधिक सुरक्षित राहू शकतील, तसेच आमचे ग्राहक ज्या पुरवठा साखळ्यांवर अवलंबून आहेत त्यांची विश्वासार्हता मजबूत करत आहोत. आपल्याला व्यापार सुरळीत चालू ठेवायचा असेल तर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याइतकेच लोकांमध्ये गुंतवणूक करणेही महत्त्वाचे आहे.”
व्हिजनस्प्रिंग फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अंशू तनेजा म्हणाल्या की: “सुरक्षित वाहन चालवण्यासाठी स्पष्ट दृष्टी आवश्यक आहे. तरीही अनेक व्यावसायिक चालक टाळता येण्याजोग्या दृष्टीदोषासह जगत आणि काम करत आहेत. ही भागीदारी वाढवल्यामुळे आम्हाला हजारो अधिक चालकांपर्यंत आवश्यक नेत्रसेवा पोहोचवता येईल. त्यामुळे रस्त्यावरील सुरक्षितता सुधारण्यास मदत होईल, उपजीविकेचे संरक्षण होईल आणि समुदाय व व्यवसाय ज्या वाहतूक जाळ्यांवर अवलंबून आहेत त्यांना आधार मिळेल.”
शिपिंग सोल्युशन्स आणि व्हिजनस्प्रिंग फाउंडेशनचा हा उपक्रम, जागतिक व्यापाराला आधार देणाऱ्या लोकांना आणि समुदायांना पाठिंबा देण्याच्या डीपी वर्ल्डच्या व्यापक वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण आहे. व्यावसायिक चालकांच्या आरोग्यात गुंतवणूक करून संपूर्ण भारतात अधिक सुरक्षित वाहतूक कार्यप्रणाली आणि अधिक लवचिक पुरवठा साखळ्यांमध्ये योगदान देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.


