Thursday, October 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’...

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन

इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या आत मराठी आवृत्ती वाचकांच्या भेटीला; अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न

 

 

पुणे, 25 ऑक्टोबर २०२६: ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पुण्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ऑगस्ट २०२६ मध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी आवृत्तीनंतर अवघ्या तीन महिन्यांच्या आत हे पुस्तक मराठी वाचकांच्या भेटीला आले आहे. पीएनजी ज्वेलर्सच्या पौड रोड येथील दालनात हा प्रकाशन सोहळा पार पडला. याच प्रसंगी दालनाचा २५ वा वर्धापनदिनही साजरा करण्यात आला.

 

भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या पीएनजी ज्वेलर्सचा १९४ वर्षांचा वारसा पुढे नेताना डॉ. सौरभ गाडगीळ यांनी अनुभवलेले चढ-उतार, घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि नेतृत्वाचा प्रवास ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्रातून उलगडतो. पेंग्विन रँडम हाऊस इंडियातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीला ऑगस्ट महिन्यात वाचकांसमोर आणण्यात आले होते. आता मराठी आवृत्तीच्या माध्यमातून डॉ. गाडगीळ यांचा हा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास मराठी वाचकांपर्यंत पोहोचणार आहे.

 

चूजिंग गोल्ड’ हे केवळ एका यशस्वी व्यावसायिकाची कहाणी नसून, परंपरेची जबाबदारी स्वीकारताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा प्रामाणिक लेखाजोखा आहे. पीएनजी ज्वेलर्सचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर डॉ. गाडगीळ यांना अनेक महत्त्वाच्या निर्णयांना सामोरे जावे लागले. या प्रवासात त्यांना आलेले अनुभव, अपयशातून मिळालेली शिकवण, आजोबा आणि आई यांच्यासोबतचे आयुष्यभर स्मरणात राहिलेले संवाद तसेच त्यांच्या विचारांना आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे अनेक प्रसंग या पुस्तकात मांडण्यात आले आहेत. जवळपास दोन शतकांचा व्यावसायिक वारसा जपत बदलत्या काळानुसार व्यवसायाला नवी दिशा देण्यामागील त्यांची भूमिका आणि विचारही यातून समोर येतात.

 

या प्रसंगी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “‘चूजिंग गोल्ड’ची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाल्यापासून हे पुस्तक मराठीत कधी आणता येईल, याची मला उत्सुकता होती. मराठी ही माझी मातृभाषा आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील अनुभव, निर्णय आणि शिकवण माझ्या स्वतःच्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हे पुस्तक लिहिताना मला माझ्या आयुष्यातील अनेक प्रसंगांकडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली. काही निर्णय योग्य ठरले, काही चुकले, तर काहींचे महत्त्व अनेक वर्षांनंतर उमगले. या सगळ्या अनुभवांनी मला घडवले आहे. या प्रवासात माझ्या कुटुंबाचे संस्कार, पीएनजी ज्वेलर्सचा समृद्ध वारसा आणि आमच्या ग्राहकांनी दाखवलेला विश्वास यांचा मोठा वाटा आहे. मराठी वाचकांशी या पुस्तकाच्या माध्यमातून अधिक जवळून संवाद साधता येणार आहे, याचे मला विशेष समाधान आहे. माझ्या या प्रवासातील एखादा अनुभव जरी वाचकाला आयुष्यातील कठीण निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेण्यासाठी उपयोगी पडला, तरी या पुस्तकाचा उद्देश सफल झाला, असे मी मानेन.”

 

या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाल्या, “डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’च्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशनाचा मान मला मिळाला, याचा खूप आनंद आहे. त्यातच पीएनजी ज्वेलर्सच्या पौड रोड दालनाच्या २५ व्या वर्धापनदिनाचा हा विशेष प्रसंग असल्याने माझ्यासाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे.”

 

‘चूजिंग गोल्ड’च्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन हे डॉ. गाडगीळ यांच्या वैयक्तिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. व्यवसायाच्या चौकटीपलीकडे जाऊन नेतृत्व, कुटुंब, नातेसंबंध, जबाबदारी आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याचे महत्त्व या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र केवळ व्यावसायिक किंवा उद्योजकांपुरते मर्यादित न राहता, आयुष्यात स्वतःचा मार्ग घडवू पाहणाऱ्या प्रत्येक वाचकाला आपलेसे वाटेल.

 

या प्रकाशन सोहळ्यासोबतच पीएनजी ज्वेलर्सच्या पौड रोड दालनाचा रौप्य महोत्सवही साजरा करण्यात आला. गेल्या २५ वर्षांत या दालनाने परिसरातील ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले असून, पीएनजी ज्वेलर्सच्या दीर्घकालीन वाटचालीतील हा एक महत्त्वा

चा टप्पा आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments