Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमृत संस्थेमार्फत आयोजित अमृत दुर्गोत्सव २०२६ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन*

अमृत संस्थेमार्फत आयोजित अमृत दुर्गोत्सव २०२६ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि.३०: महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा वारसा जपत नव्या पिढीमध्ये शिवविचारांची प्रेरणा जागवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर, यंदा पुन्हा एकदा या उपक्रमाची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये करण्यासाठी या ऐतिहासिक विक्रमाचा भाग होण्यासाठी समस्त पुणेकरांनी व शिवप्रेमीनी विक्रमी संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश केसकर यांनी केले आहे.

 

दिवाळीच्या काळात घरोघरी, शाळांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये मातीचे किल्ले बनवण्याची आपली पारंपरिक संस्कृती जपून गड कोटांच्या संवर्धनाचा संदेश देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांनी बनवलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीचा फोटो www.amrutdurgotsav.com या अधिकृत पोर्टलवर अपलोड केल्यावर मा. मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र तात्काळ प्रदान केले जाणार आहे. सर्व नागरिकांना या मोहिमेत एकत्र आणून पुन्हा एकदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी ऐतिहासिक नोंदणी नोंदवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या सांस्कृतिक चळवळीत प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments