Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुस्ती खेळाकरिता आयोजित निवड चाचणीकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन*

कुस्ती खेळाकरिता आयोजित निवड चाचणीकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. 30: मिशन लक्ष्यवेध या योजनेंतर्गत मुलांच्या कुस्ती खेळासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणीकरिता अधिकाधिक खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे विभागाचे क्रीडा युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

 

मिशन लक्ष्यवेध या योजनेतर्गत अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शुटींग, रोईग, सेलिंग, टेबल टेनिस व लॉन टेनिस या १२ क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या क्रीडा प्रकारांपैकी अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, शुटींग, रोईंग, टेबल टेनिस या ८ खेळांचे विभागीय स्तरावरील क्रीडा निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली असून पुणे विभागास या आठ खेळांची केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली आहे.

 

या क्रीडा प्रकारापैकी अॅथलेटिक्स, शुटींग, रोईंग, कुस्ती, टेबल टेनिस या ६ खेळांचे प्रत्येकी २० खेळाडू व हॉकीकरिता ४० खेळाडूंची निवड करण्याकरिता २३ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे व २४ जुलै २०२६ रोजी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, माळेगाव, नीरा बारामती रोड, बारामती येथे आयोजित करण्यात आली होती. या खेळांचे निवासी प्रशिक्षण केंद्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरु आहे. तथापि, कुस्ती या खेळाकरिता अल्प प्रतिसाद मिळाल्याने कुस्ती (मुले) या खेळाची निवड चाचणी पुन्हा घेण्यात येत आहे.

 

राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील २ वर्षातीला क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था स्वतः करायची आहे.

 

विभागस्तर क्रीडा निपुणता केंद्राच्या प्रवेशाकरिता चाचण्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून आवश्यक साहित्यासह खेळाडूंनी उपस्थित राहावे. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त २५ वर्षा आतील मुले किंवा मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी) इच्छुक खेळाडूंना निवासी प्रशिक्षण केंद्राच्या निवड चाचणीकरिता प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीकरिता उदय शेळके (भ्र.ध्व.क्र. ८६०५८२१७८५) आणि आकाश सलगर (भ्र.ध्व.क्र. ९२८४८०६००३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments