Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॉँग्रेस पक्षाच्या दबावामुळे* *अखेर हिंजवडी मेट्रोला मुहूर्त !* ...

कॉँग्रेस पक्षाच्या दबावामुळे* *अखेर हिंजवडी मेट्रोला मुहूर्त !* *- माजी आमदार मोहन जोशी*

 

 

पुणे : हिंजवडी आणि परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी याकरिता हिंजवडी-शिवाजीनार मेट्रो सेवा चालू व्हावी, असा दबाव काँग्रेस पक्षाने सातत्याने आणला. त्या दणक्याने झुकावे लागून मेट्रो सुरू होत आहे पण, शंभर दिवसांहून अधिक काळ उशीर का लावला? याची उत्तरे भाजप नेत्यांती घावीत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

 

माण हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील २३ स्टेशन्सपैकी १७ स्टेशन्स वर मेट्रो थांबणार आहे. दि.२५ नोव्हेंबर २०२१ रोजी मेट्रो च्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मार्च २०२५ मध्ये या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. ती मुदत वाढवून मार्च २०२६ करण्यात आली. त्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासण्या करून मेट्रो धावण्यासाठी मंजुरी दिली. त्यालाही १०० दिवस उलटून गेले. भाजप नेते तांत्रिक कारणे पुढे करून मेट्रो प्रवाशांसाठी खुली करत नव्हते. खरे तर त्यांना पंतप्रधान मोदी यांना बोलावून गाजावाजा करायचा होता. दरम्यान काँग्रेस पक्षाने पीएमआरडीएकडे निवेदने पाठवून आंदोलनांचा इशारा दिला. प्रसारमाध्यमातून भाजप नेत्यांना विलंब होण्याची कारणे काय? असे, सवाल केले. काँग्रेसच्या दबावामुळे आता तीन तारखेपासून मेट्रो धावू लागेल आणि हिंजवडीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

पुणेकरांचे हित सांभाळणारे प्रभावी नेतृत्व पुण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे नाही. शिवाय यापूर्वींच्या मेट्रो मार्गांचे उद्घाटन अवघे ४, ५ किलोमीटर झाले की, भाजपने पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून घेतले. अशा छोट्या अंतराच्या मेट्रोचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते करून घेण्याने पंतप्रधान पदाची गरिमा जाते. हे भाजपने कधीच लक्षात घेतले नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो प्रकल्प लांबत चालल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. पुणेकरांना मनस्ताप होत होता. त्याकरीता कॉंग्रेस पक्षाने पुणेकरांचे हित जोपासण्यासाठी तीव्र आंदोलने केली आणि त्यातून निर्माण झालेल्या जनमताचा रेट्यामुळे आता ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मेट्रोचे ऑनलाईन उदघाटन करतील. हा कॉंग्रेस पक्षाचा आणि पुणेकरांचा विजय मानला पाहिजे.

 

अजूनही पुण्यात अनेक मेट्रो मार्गांचे काम चालू आहे त्याचे उद्घाटनही ३-४ किलोमीटर झाले की पंतप्रधानांच्या हस्ते करायचे आणि पंतप्रधान पदाची गरिमा घालवायची असे सत्ताधारी भाजपने करू नये. पंतप्रधानांना पुण्यात आणून आणि त्यासाठी अनेक महिने थांबवून मग इव्हेंट करीत उत्सव साजरा करायचा हे भाजपने थांबवावे आणि पुणेकरांसाठी मेट्रो लवकर कशी सुरू होईल यावर भर द्यावा अशीच प्रत्येक पुणेकरांची अपेक्षा आहे. भाजप यातून बोध घेईल, अशी अपेक्षा आहे, असे मोहन जोशींनी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments