Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवाळीपूर्वी बोनस व वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याचा...

दिवाळीपूर्वी बोनस व वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याचा मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांचा इशारा

 

 

पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी ) दि.३१ ऑक्टोबर २०२६:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस आणि वेतन अदा करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. दिवाळीपूर्वी कामगारांना बोनस व वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर कामगार कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असून, संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिला आहे.

 

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापौर रवी लांडगे यांची भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला.

 

या बैठकीला मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. त्यानुसार मानधन कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याबाबत परिपत्रक काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे परिपत्रक जास्तीत जास्त सोमवारी सकाळपर्यंत जारी करण्यात येणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

 

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या ठेकेदारांना परिपत्रकाद्वारे बोनस देण्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत. कामगारांना वेळेत बोनस व वेतन मिळावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.तसेच कामगारांच्या इतर प्रश्नांवरही महापौरांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित विषयांवर बैठक घेऊन सविस्तर चर्चा व निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रमोद जगताप यांनी स्पष्ट केले.दिवाळीपूर्वी कामगारांना बोनस आणि वेतन मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाने ठेकेदारांना स्पष्ट निर्देश देण्याची तयारी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा या निमित्ताने देण्यात

आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments