Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorized*चंदननगर परिसरातील चार प्रमुख रस्त्यांवर पी-१, पी-२ पार्किंग व्यवस्था प्रस्तावित* *नागरिकांना...

*चंदननगर परिसरातील चार प्रमुख रस्त्यांवर पी-१, पी-२ पार्किंग व्यवस्था प्रस्तावित* *नागरिकांना सूचना व हरकती १६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन*

 

 

 

पुणे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : पुणे शहरातील चंदननगर वाहतूक विभागांतर्गत इराणी कॅफे सर्कल ते स्वीट इंडिया चौक, बार्कलेज चौक, रेडिसन ब्ल्यू हॉटेल ते टस्कन सोसायटी फेज-२ गेट तसेच बीएनवाय (प्रेस्टीज बिल्डिंग) परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे.

 

या परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या असून, नागरिकांकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे.

 

प्रस्तावित पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे इराणी कॅफे सर्कल ते स्वीट इंडिया चौकापर्यंत ५०० मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग. इराणी कॅफे सर्कल ते बार्कलेज चौकापर्यंत ५०० मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग. रेडिसन ब्ल्यू हॉटेल ते टस्कन सोसायटी फेज-२ गेटपर्यंत २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१, पी-२ पार्किंग. बीएनवाय (प्रेस्टीज बिल्डिंग) ते टस्कन सोसायटी फेज-३ गेटपर्यंत २०० मीटर अंतरावर पी-१, पी-२ पार्किंग.

 

याबाबत नागरिकांना काही सूचना किंवा हरकती असल्यास त्यांनी १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा, पोस्ट ऑफिस बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात.

 

नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करून तसेच अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा अपवाद वगळून अंतिम आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments