Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवाळीनिमित्त पुणे आरटीओमध्ये पसंतीच्या MH61 मालिकेतील वाहन क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज स्वीकारणार*

दिवाळीनिमित्त पुणे आरटीओमध्ये पसंतीच्या MH61 मालिकेतील वाहन क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज स्वीकारणार*

 

 

पुणे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची वाढती खरेदी लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी MH61 या संकेतांकांतर्गत (MH61 K 0001) नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून राखून ठेवण्यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनधारकांकडून स्वतंत्रपणे आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

 

चारचाकी वाहनांसाठी पसंतीच्या क्रमांकांचे अर्ज ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारण्यात येतील. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता लिलाव प्रक्रिया होईल. दुचाकी वाहनांसाठी ५ नोव्हेंबर रोजी याच वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यांचा लिलाव ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात होणार आहे. दोन्ही लिलावांसाठी डीडी स्वीकारण्याची अंतिम वेळ दुपारी ३.१५ अशी आहे.

 

अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डची साक्षांकित प्रत आणि विहित शुल्काचा डीडी जोडणे आवश्यक आहे. डीडी ‘R.T.O., Pune’ या नावाने पुण्यातील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असावा. अर्जदारांनी अचूक मोबाईल क्रमांक नमूद करावा. पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रातील पत्त्याचा पुरावा असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज करावेत. अपूर्ण किंवा चुकीच्या रकमेचे डीडी असलेले अर्ज बाद करण्यात येतील.

 

लिलावात पसंतीचा क्रमांक न मिळालेल्या अर्जदारांनी मूळ डीडी पाच दिवसांच्या आत कार्यालयातून परत घ्यावा. लिलावानंतर शिल्लक राहिलेले पसंतीचे क्रमांक https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments