Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedवसतिगृहांमध्ये माळी व पहारेकरी पदांसाठी तात्पुरती भरती* *इच्छुक उमेदवारांनी १५ नोव्हेंबरपर्यंत...

वसतिगृहांमध्ये माळी व पहारेकरी पदांसाठी तात्पुरती भरती* *इच्छुक उमेदवारांनी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत*

 

पुणे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा): पुणे जिल्ह्यातील सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवी पेठ येथे एक माळी आणि मुलांचे वसतिगृह, पर्वती येथे एक पहारेकरी अशा दोन अशासकीय पदांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

या भरतीसाठी इच्छुक व पात्र माजी सैनिक तसेच इतर नागरिकांनी आपले अर्ज संबंधित वसतिगृहांमध्ये १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी सैनिकी मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिकेशी भ्रमणध्वनी क्रमांक ७७७६८०५८२४ तसेच मुलांच्या वसतिगृहाच्या अधीक्षकाशी भ्रमणध्वनी क्रमांक ७३००२३१०५० वर संपर्क साधावा. असे मेजर एस. फिरासत (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments