Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्मार्ट प्रकल्पाचे माहिती व तक्रार निवारण कॉल सेंटर सुरू*

स्मार्ट प्रकल्पाचे माहिती व तक्रार निवारण कॉल सेंटर सुरू*

 

 

पुणे, दि. ४: महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्याच्या कृषी पणन संचालनालयाच्यावतीने शेतकरी, व्यापारी आणि कृषी पणन क्षेत्रातील संबंधित घटकांसाठी माहिती व तक्रार निवारण कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन संचालक तथा स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख संजय कदम यांनी केले आहे.

 

या कॉल सेंटरचा विनाशुल्क टोल फ्री क्रमांक १८००२१०११७७ तसेच ०२०-६५०४५००० हा संपर्क क्रमांक असून संबंधित घटकांना सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० या वेळेत विनाशुल्क संपर्क साधता येणार आहे.

 

या कॉल सेंटरच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खासगी बाजारांच्या कामकाजासंदर्भात माहितीसोबतच बाजार नियमनातील सुधारणा, नवीन परवाना प्रक्रिया, तसेच कृषी पणन व्यवस्थेशी संबंधित नियम व अटी यांची माहिती व मार्गदर्शन मिळविण्यासह तसेच तक्रारीही नोंदविता येणार आहेत. कृषी बाजार समित्यांच्या कामकाजाबाबत अडचणी, प्रश्न किंवा तक्रारी असल्यास शेतकरी व व्यापाऱ्यांना या कॉल सेंटरवर संपर्क साधता येणार आहे, असेही श्री. कदम यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments