Thursday, November 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवाळी पाडव्याला शिवरायांच्या अश्वारुढ स्मारकाला ८ हजार पणत्यांची मानवंदना सलग १५ व्या...

दिवाळी पाडव्याला शिवरायांच्या अश्वारुढ स्मारकाला ८ हजार पणत्यांची मानवंदना सलग १५ व्या वर्षेी शिवजयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम

पुणे : दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ… तुतारीची ललकारी… सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर… आणि स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, पुणेकरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी… जय शिवाजी.. हर हर महादेवचा… मर्दानी जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात…तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अष्ट सहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विश्वातील पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ स्मारकापाशी व पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पा पाशी शिवजयंती महोत्सव समिती तर्फे सलग १५ व्या वर्षी “छत्रपती श्री शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा” संप्पन्न झाला.

 

श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन समितीच्या महिला सदस्या रिंकल अमित गायकवाड, नगरसेविका स्वप्नाली नितीन पंडित, ललिता रवींद्र कंक, अश्विनी शंकर कडू, विजया सागर पवार, प्रिया निलेश जेधे, पूनम रोहित घोरपडे, प्रियांका मोहन पासलकर, कामिनी प्रविण गायकवाड, दिपाली विशाल गव्हाणे, जोत्स्ना निलेश जगताप, शोभा भोई सांसह उपस्थित महिलांच्या हस्ते तसेच समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, समीर जाधवराव, शंकर कडू, निलेश जेधे, मंगेश शिळीमकर, किरण शितोळे, गोपी पवार, ईशान अमित गायकवाड, मोहन पासलकर तसेच शिवकालीन स्वराज्यघराण्यांच्या वंशजांच्या व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

 

शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमूठ निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात पदार्पण केल्याबद्दल प्रतापगड किल्लेदार सरदार मंबाजी नाईक सोनवणे, सरदार थोरात, सरदार वाबळे स्वराज्यघराणे या स्वराज्यघराण्यांचा दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच ६ जून शिवराज्याभिषेक दिनी ५०० महिलांची पुण्यातील पहिली भव्य दुचाकी रॅली काढणाऱ्या तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्या व पुणे मनपाच्या नवनिर्वाचित सदस्या नगरसेविका स्वप्नाली नितीन पंडित यांचा शिवरायांचा जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला.

 

अमित गायकवाड म्हणाले, सलग १५ व्या वर्षी दीपोत्सव साजरा कराताना लक्ष लक्ष हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे. अमली पदार्थ विरोधी मोहिमेत समितीची सर्व स्वराज्यघराणी एकदिलाने पोलीस प्रशासना बरोबर काम करणार आहेत. शिवरायांचे जगातील हे पहिले भव्य अश्वारुढ स्मारक तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. स्मारकाने यंदा ९९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्मारकाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना देणारा हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य दीपोत्सव आहे.

दीपोत्सवाचे आयोजन दीपोत्सवाचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, समीर जाधवराव, निलेश जेधे, शंकर कडू, किरण शितोळे, मोहन पासलकर, निलेश जगताप, विशाल गव्हाणे, महेंद्र भोईटे यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments