Tuesday, November 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गणेश देवखिळे,...

कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गणेश देवखिळे, गौरव राव यांना दुहेरी मुकुट 

 

 

50 वर्षांवरील पुरुष गटात हरजिंदर सिंग चिरागिया व संजय चंदवानी यांना विजेतेपद

 

नांदेड, 17 नोव्हेंबर 2026: नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी शहर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गणेश देवखिळे व गौरव राव यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

 

एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत 30वर्षांवरील पुरुष गटात गणेश देवखिळे व गौरव राव या जोडीने गौरबदीप घोष व जयनारायण के. आर. या अव्वल मानांकित जोडीचा 6-2, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 50 वर्षांवरील पुरुष गटात हरजिंदर सिंग चिरागिया व संजय चंदवानी यांनी जतिंदर गंभीर व भूपिंदर कुमार यांचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.

 

55वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत बिगर मानांकित केतन बेडेकरने अव्वल मानांकित इलमुरुगु अय्यासामी यांचा 6-4, 2-6, 10-5 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. 70वर्षावरील पुरुष गटात उपांत्य फेरीत शिव मोरने अव्वल मानांकित प्रदीप शर्माचा 6-4, 7-5 असा तर, शाम गायकवाडने दुसऱ्या मानांकित रवींदर रेड्डी पेंडलीचा 7-5, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

 

निकाल: 55वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी

केतन बेडेकर (भारत)वि.वि.इलमुरुगु अय्यासामी (भारत) [1]6-4, 2-6, 10-5;

अशोक इंगळे (भारत)वि.वि.शशी गायकवाड (भारत) 6-0, 6-0;

 

60 वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी

संजय कुमार (भारत) [1]वि.वि.रघुनाथ होळंबे (भारत) 6-0, 6-3;

एस. एन. वशिष्ठ (भारत) [2]वि.वि.आलोक रैना (भारत) 6-3, 6-4;

 

70वर्षावरील पुरुष गट: उपांत्य फेरी

शिव मोर (भारत) वि.वि.प्रदीप शर्मा (भारत) [1]6-4, 7-5;

शाम गायकवाड (भारत)वि.वि.रवींदर रेड्डी पेंडली (भारत) [2]7-5, 6-3;

 

80 वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी

कमलनयन शिरोळकर (भारत)वि.वि.सीताराम न्यायनिर्गुणे (भारत) [1]6-1, 6-0;

जनार्दन कांबळे(भारत)[2]वि.वि.दामोदर नंदा(भारत) 6-1 सामना सोडून दिला;

 

दुहेरी: अंतिम फेरी

30वर्षांवरील पुरुष: गणेश देवखिळे/ गौरव राव(भारत)वि.वि.गौरबदीप घोष/ जयनारायण के. आर. (भारत) [1] 6-2, 6-4;

50 वर्षांवरील पुरुष:हरजिंदर सिंग चिरागिया / संजय चंदवानी(भारत)वि.वि.जतिंदर गंभीर / भूपिंदर कुमार (भा

रत)6-2, 6-3.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments