वी बिझनेसने आपल्या बिझनेस कम्युनिकेशन पोर्टफोलिओमध्ये एक नवीन माध्यम म्हणून व्हॉट्सॲपचा समावेश केला आहे; यामध्ये एमएसएमईंसाठी १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत डिजिटल ऑनबोर्डिंग आणि मोठ्या उद्योगांसाठी एकात्मिक CPaaS/CCaaS सोल्यूशन्स उपलब्ध आहेत.
गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲप हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले आहे. कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी, व्यावसायिकांशी संवाद साधण्यासाठी, शासकीय व नागरी सेवांचा लाभ घेण्यासाठी, तसेच मेट्रो तिकिटापासून ते विम्यापर्यंत सर्व काही खरेदी करण्यासाठी हे सर्वात सोपे माध्यम ठरले आहे; आणि हे सर्व काही ॲपमधून बाहेर न पडता एकाच ठिकाणी शक्य होते. आज ग्राहक संवादासाठी व्हॉट्सॲपला सर्वाधिक पसंती देत असल्याने, व्यावसायिकांनीही आपल्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी या प्लॅटफॉर्मची निवड केली आहे.
पार्टनरशी समन्वय साधणे, ऑनबोर्डिंगची कालमर्यादा पाळणे, खर्चाचे नियोजन करणे, मेसेज टेम्प्लेट्सना मंजुरी मिळवणे आणि सर्व टीम्समध्ये ग्राहकांना एकसमान अनुभव देणे; अशी अनेक कामे व्यवसायांना दररोज हाताळावी लागतात. या सर्व गोष्टी सुलभ करण्यासाठी व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सॲपची मदत घेत आहेत.
हीच गरज लक्षात घेऊन, ‘वी‘ ची एंटरप्राइझ शाखा असलेल्या ‘वी बिझनेस‘ने ‘व्हॉट्सॲप बिझनेस सोल्यूशन्स‘ सादर केले आहेत. ग्राहकांना आधीपासूनच आवडणाऱ्या या माध्यमावरून लहान–मोठ्या व्यवसायांना आता ग्राहकांशी अधिक प्रभावीपणे जोडले जाता येणार आहे. या सोल्यूशन्सच्या मदतीने ग्राहकांशी होणारा संवाद ऑटोमॅटिक करणे, त्यांना वैयक्तिक स्वरूपाची माहिती देणे आणि व्यवसाय वाढवणे अधिक सोपे होईल.
या लाँचप्रसंगी बोलताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ एंटरप्राइझ बिझनेस ऑफिसर एम. पी. सुनील कुमार म्हणाले, “पुढच्या काळात ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत ही थेट, स्मार्ट आणि अधिकाधिक एआय–आधारित असणार आहे. ग्राहक ज्या माध्यमांचा रोज वापर करतात, तिथेच व्यवसाय उपलब्ध असावेत अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळेच व्हॉट्सॲप आता या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. वी बिझनेसच्या माध्यमातून आम्ही व्यवसायांना केवळ व्हॉट्सॲपवर आणण्यापुरते मर्यादित न राहता, मोठ्या प्रमाणावर प्रत्येक ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार अधिक स्मार्ट आणि अखंड जोडलेला अनुभव देण्यास मदत करत आहोत. आमच्या ‘व्हॉट्सॲप बिझनेस सोल्यूशन्स‘मध्ये एआय ऑटोमेशन, सर्व माध्यमांवरून संवाद साधण्याची सुविधा, मेटाचा विशेष सपोर्ट आणि सीपास (CPaaS) व सीकास (CCaaS) प्रणालींची सहज जोड दिली आहे. लहान आणि मध्यम उद्योगांना अवघ्या १५ मिनिटांत ही सेवा सुरू करून देण्यापासून ते मोठ्या उद्योगांचा ग्राहक संवाद अधिक प्रभावी करण्यापर्यंत, आम्ही एका साध्या संवादाचे ग्राहकांशी असलेल्या घट्ट नात्यात रूपांतर करत आहोत. व्यवसायांना अधिक जोडलेले, स्मार्ट आणि भविष्यासाठी सज्ज करणे, हेच आमचे ध्येय आहे.”
लहान-मोठ्या सर्वच प्रकारच्या व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन ‘वी बिझनेस व्हॉट्सॲप फॉर बिझनेस सोल्यूशन्स‘ तयार करण्यात आले आहे. यामध्ये लहान आणि मध्यम उद्योगांसाठी वापरण्यास अतिशय सोपी आणि तात्काळ सुरू करता येणारी सेवा आहे, तर मोठ्या उद्योगांसाठी सर्व माध्यमांशी सखोलपणे जोडलेली प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे:
लहान आणि मध्यम उद्योगांसाठी:
- जलद डिजिटल ऑनबोर्डिंग: व्यवसाय ‘वी‘च्या वेबसाइटवर जाऊन स्वतःच (सेल्फ-सर्व्हिस डिजिटल प्रक्रियेद्वारे) १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत व्हॉट्सॲप सेवा सुरू करू शकतात. यामध्ये प्लॅनची निवड, पेमेंट आणि सेवा सुरू करणे या सर्व गोष्टी ऑनलाइन पूर्ण होतात.
- ग्राहक संवादासाठी रेडी-टू-यूज साधने: या स्वतंत्र सोल्यूशनमुळे सूचना, अपडेट्स आणि जाहिरातींसाठी एकत्रित मेसेज (बल्क ब्रॉडकास्ट) पाठवता येतात. तसेच, यामध्ये इंटरॲक्टिव्ह बटणे आणि कॅटलॉग असलेले तयार टेम्प्लेट्स आणि मेसेज पोहोचल्याची, ग्राहकांच्या प्रतिसादाची व संवादाची माहिती देणारे सोपे ॲनालिटिक्सही मिळतात.
मोठ्या उद्योगांसाठी:
- एआय-आधारित ऑटोमेशन आणि एंटरप्राइझ चॅटबॉट्स: हे एकात्मिक सोल्यूशन मोठ्या संख्येने होणाऱ्या ग्राहक संवादासाठी प्रगत ऑटोमेशन, एआय-आधारित चॅटबॉट्सद्वारे स्मार्ट संभाषण हाताळणी आणि ग्राहकांच्या गरजांचा अंदाज घेऊन वैयक्तिक सेवा देण्यास मदत करते.
- ओम्नीचॅनेल जोडणी आणि प्रगत सपोर्ट: व्हॉट्सॲप मेसेजिंग आणि व्हॉइस सेवा आता वी बिझनेसच्या सध्याच्या एसएमएस, व्हॉइस, ईमेल आणि लाइव्ह चॅट यांसारख्या सीपास (CPaaS) आणि सीकास (CCaaS) सुविधांसोबत एकत्रित वापरता येतील. यासोबतच जलद समस्या निवारण आणि मार्गदर्शनासाठी ॲनालिटिक्स, व्हॉट्सॲप व्हॉइस कॉलिंग आणि विशेष सपोर्टची जोडही देण्यात आली आहे.
तसेच मोठ्या उद्योगांसाठी सादर केली व्हॉट्सॲप बिझनेस सोल्यूशन्स
वी बिझनेसने आपल्या बिझनेस कम्युनिकेशन पोर्टफोलिओमध्ये एक नवीन माध्यम म्हणून व्हॉट्सॲपचा समावेश केला आहे; यामध्ये एमएसएमईंसाठी १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत डिजिटल ऑनबोर्डिंग आणि मोठ्या उद्योगांसाठी एकात्मिक CPaaS/CCaaS सोल्यूशन्स उपलब्ध आहेत.
गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲप हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले आहे. कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी, व्यावसायिकांशी संवाद साधण्यासाठी, शासकीय व नागरी सेवांचा लाभ घेण्यासाठी, तसेच मेट्रो तिकिटापासून ते विम्यापर्यंत सर्व काही खरेदी करण्यासाठी हे सर्वात सोपे माध्यम ठरले आहे; आणि हे सर्व काही ॲपमधून बाहेर न पडता एकाच ठिकाणी शक्य होते. आज ग्राहक संवादासाठी व्हॉट्सॲपला सर्वाधिक पसंती देत असल्याने, व्यावसायिकांनीही आपल्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी या प्लॅटफॉर्मची निवड केली आहे.
पार्टनरशी समन्वय साधणे, ऑनबोर्डिंगची कालमर्यादा पाळणे, खर्चाचे नियोजन करणे, मेसेज टेम्प्लेट्सना मंजुरी मिळवणे आणि सर्व टीम्समध्ये ग्राहकांना एकसमान अनुभव देणे; अशी अनेक कामे व्यवसायांना दररोज हाताळावी लागतात. या सर्व गोष्टी सुलभ करण्यासाठी व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सॲपची मदत घेत आहेत.
हीच गरज लक्षात घेऊन, ‘वी’ ची एंटरप्राइझ शाखा असलेल्या ‘वी बिझनेस’ने ‘व्हॉट्सॲप बिझनेस सोल्यूशन्स’ सादर केले आहेत. ग्राहकांना आधीपासूनच आवडणाऱ्या या माध्यमावरून लहान-मोठ्या व्यवसायांना आता ग्राहकांशी अधिक प्रभावीपणे जोडले जाता येणार आहे. या सोल्यूशन्सच्या मदतीने ग्राहकांशी होणारा संवाद ऑटोमॅटिक करणे, त्यांना वैयक्तिक स्वरूपाची माहिती देणे आणि व्यवसाय वाढवणे अधिक सोपे होईल.
या लाँचप्रसंगी बोलताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ एंटरप्राइझ बिझनेस ऑफिसर एम. पी. सुनील कुमार म्हणाले, “पुढच्या काळात ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत ही थेट, स्मार्ट आणि अधिकाधिक एआय-आधारित असणार आहे. ग्राहक ज्या माध्यमांचा रोज वापर करतात, तिथेच व्यवसाय उपलब्ध असावेत अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळेच व्हॉट्सॲप आता या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. वी बिझनेसच्या माध्यमातून आम्ही व्यवसायांना केवळ व्हॉट्सॲपवर आणण्यापुरते मर्यादित न राहता, मोठ्या प्रमाणावर प्रत्येक ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार अधिक स्मार्ट आणि अखंड जोडलेला अनुभव देण्यास मदत करत आहोत. आमच्या ‘व्हॉट्सॲप बिझनेस सोल्यूशन्स’मध्ये एआय ऑटोमेशन, सर्व माध्यमांवरून संवाद साधण्याची सुविधा, मेटाचा विशेष सपोर्ट आणि सीपास (CPaaS) व सीकास (CCaaS) प्रणालींची सहज जोड दिली आहे. लहान आणि मध्यम उद्योगांना अवघ्या १५ मिनिटांत ही सेवा सुरू करून देण्यापासून ते मोठ्या उद्योगांचा ग्राहक संवाद अधिक प्रभावी करण्यापर्यंत, आम्ही एका साध्या संवादाचे ग्राहकांशी असलेल्या घट्ट नात्यात रूपांतर करत आहोत. व्यवसायांना अधिक जोडलेले, स्मार्ट आणि भविष्यासाठी सज्ज करणे, हेच आमचे ध्येय आहे.”
लहान-मोठ्या सर्वच प्रकारच्या व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन ‘वी बिझनेस व्हॉट्सॲप फॉर बिझनेस सोल्यूशन्स’ तयार करण्यात आले आहे. यामध्ये लहान आणि मध्यम उद्योगांसाठी वापरण्यास अतिशय सोपी आणि तात्काळ सुरू करता येणारी सेवा आहे, तर मोठ्या उद्योगांसाठी सर्व माध्यमांशी सखोलपणे जोडलेली प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे:
लहान आणि मध्यम उद्योगांसाठी:
जलद डिजिटल ऑनबोर्डिंग: व्यवसाय ‘वी’च्या वेबसाइटवर जाऊन स्वतःच (सेल्फ-सर्व्हिस डिजिटल प्रक्रियेद्वारे) १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत व्हॉट्सॲप सेवा सुरू करू शकतात. यामध्ये प्लॅनची निवड, पेमेंट आणि सेवा सुरू करणे या सर्व गोष्टी ऑनलाइन पूर्ण होतात.
ग्राहक संवादासाठी रेडी-टू-यूज साधने: या स्वतंत्र सोल्यूशनमुळे सूचना, अपडेट्स आणि जाहिरातींसाठी एकत्रित मेसेज (बल्क ब्रॉडकास्ट) पाठवता येतात. तसेच, यामध्ये इंटरॲक्टिव्ह बटणे आणि कॅटलॉग असलेले तयार टेम्प्लेट्स आणि मेसेज पोहोचल्याची, ग्राहकांच्या प्रतिसादाची व संवादाची माहिती देणारे सोपे ॲनालिटिक्सही मिळतात.
मोठ्या उद्योगांसाठी:
एआय-आधारित ऑटोमेशन आणि एंटरप्राइझ चॅटबॉट्स: हे एकात्मिक सोल्यूशन मोठ्या संख्येने होणाऱ्या ग्राहक संवादासाठी प्रगत ऑटोमेशन, एआय-आधारित चॅटबॉट्सद्वारे स्मार्ट संभाषण हाताळणी आणि ग्राहकांच्या गरजांचा अंदाज घेऊन वैयक्तिक सेवा देण्यास मदत करते.
ओम्नीचॅनेल जोडणी आणि प्रगत सपोर्ट: व्हॉट्सॲप मेसेजिंग आणि व्हॉइस सेवा आता वी बिझनेसच्या सध्याच्या एसएमएस, व्हॉइस, ईमेल आणि लाइव्ह चॅट यांसारख्या सीपास (CPaaS) आणि सीकास (CCaaS) सुविधांसोबत एकत्रित वापरता येतील. यासोबतच जलद समस्या निवारण आणि मार्गदर्शनासाठी ॲनालिटिक्स, व्हॉट्सॲप व्हॉइस कॉलिंग आणि विशेष सपोर्टची जोडही
देण्यात आली आहे.


