Friday, November 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी आमदार मोहन जोशी*  *यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या*  *सचिवपदी...

माजी आमदार मोहन जोशी*  *यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या*  *सचिवपदी नियुक्ती*  *कर्नाटकच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी* 

 

 

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे कर्नाटक राज्याच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी मोहन जोशी यांची नियुक्ती केली आणि नियुक्तीची घोषणा अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी केली. या राष्ट्रीय पदावर नियुक्ती झालेले मोहन जोशी हे पुण्यातील पहिले कॉंग्रेस नेते आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी मोहन जोशी यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले.

 

गेली ४५ वर्षे काँग्रेस संघटनेत राहून मोहन जोशी यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पक्षाचे ते विद्यमान वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. स्व.पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी मोहन जोशी यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. पुणे शहर युवक काँग्रेस, पुणे शहर काँग्रेस चे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या आठ वर्षांच्या कालावधीत विविध उपक्रम राबवून संघटनेला गती दिली आणि महाराष्ट्रात ‘पुणे काँग्रेस पॅटर्न’ची ओळख निर्माण केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पदही त्यांनी सांभाळले आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पक्षाच्यावतीने निवडणूक लढविली. सन २००८ ते १४ मोहन जोशी विधानपरिषदेचे सदस्य होते. १२ राज्यांमध्ये पक्षाच्यावतीने जोशी यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले आहे. पक्ष संघटनेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या चिटणीस पदाची जबाबदारी त्या़ंच्यावर सोपविण्यात आली आहे.

 

पक्षाने माझ्या कामावर विश्वास दाखवला आणि नवीन जबाबदारी सोपविली आहे. ती मी समर्थपणे सांभाळेन. आदरणीय नेते, अखिल भारतीय पक्षाध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी, खासदार प्रियांका गांधी, अ.भा.जनरल सेक्रेटरी के.सी.वेणुगोपाल यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ करेन आणि त्यांनी दिलेले पक्षाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करेन. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने मोठी संधी दिली याबद्दल मी पक्षातील सर्व नेत्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments