Friday, November 20, 2026
Google search engine
HomeUncategorized२६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅलीचे आयोजन*

२६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅलीचे आयोजन*

 

 

पुणे, दि.२०: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

रॅलीची सुरुवात सकाळी ८.३० वाजता भिडे वाडा, बुधवार पेठ येथून होईल. ही रॅली लाल महल, फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक, जुनी जिल्हा परिषद या मार्गावरून जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून रॅलीचा समारोप होणार आहे.

 

या रॅलीमध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments