पुणे : पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात वैकुंठ चतुर्दशी च्या दिवशी सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी १ यावेळेत थेट गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती श्रीरामजी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त मोरेश्वर तुळशीबागवाले यांनी दिली.
पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात दरवर्षी प्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला आकर्षक मंदिर सजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार असून या सोहळ्यात भाविकानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.


