पुणे, २३ एप्रिल २०२४ : तआरुफ कल्चरल फाउंडेशन तर्फे तआरुफ सिग्नेचर शायरी मेहफिलचे आयोजन रविवार, 28 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी ५.३० वाजता कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार जुबैर अली तबिश यांच्यासह प्रेयस हाथी, अनुज कपूर, अभिषेक सलापे, आदित्य बारस्कर, शाहनवाज काझी, जवाद सय्यद, सुरेंद्र भाटिया, प्रशांत कात्यायन, इम्तियाझ खान, तौफिक आझम हे कलाकार हिंदुस्थानी आणि उर्दू कविता सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून मोफत पास करिता taarruf.org ला भेट द्या किंवा 9890618399 क्रमांकावर संपर्क साधा.स्वतः कवी असलेले लेफ्टनंट जनरल (डॉ.) मुकेश सभरवाल, पीव्हीएसएम, एव्हीएसएम आणि बीएआर, व्हीएसएम हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला अनेक संस्थांनी साहाय्य केले असून फेकंड सॉफ्टवेअर सर्व्हिसेस , आयआयइबीएम, बाय द लेक, सतनाम हर्बल्स, पूना युनिफॉर्म्स, ऑल व्हाइट्स, १. ०१ आणि फोटोपंडितस यांचा समावेश आहे.
तआरुफ कल्चरल फाउंडेशन ही एक नोंदणीकृत ना-नफा संस्था असून भाषेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची समृद्धता आणि विविधता जतन करण्यासाठी समर्पित आहे.


