Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमॉल ऑफ मिलेनियम, वाकड मतदार जनजागृती अभियान

मॉल ऑफ मिलेनियम, वाकड मतदार जनजागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली मॉल ऑफ मिलेनियम, वाकड येथे मतदान जनजागृती करण्यात आली.

 

सदर कार्यक्रमाला मॉलचे मॅनेजर श्री.अमित अम्बुरे, श्री.गणेश भगत, श्री.बापुसाहेब गवळी, श्री.विनोद जाधव, श्रीम.सुमिधा तिडके, श्रीम.रीझवाना शेख व इतर कर्मचारी तसेच २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री.राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते.

 

यामध्ये कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच ‘आपले अमूल्य मत, करेल लोकशाही मजबूत’, ‘एक दोन तीन चार, मतदानाचा मजबूत विचार’, असा संदेश देण्यात आला. विविध प्रकारची घोषवाक्ये यामार्फत जागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचा-यांकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments