Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिनाभर सुरु असणाऱ्या पुणे वर्ल्ड बुक डे उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन

महिनाभर सुरु असणाऱ्या पुणे वर्ल्ड बुक डे उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन

पुणे 24 एप्रिल 2024 : जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुणे वर्ल्ड बुक डे या महिनाभर सुरू असलेल्या विशेष कार्यक्रमाच्या समारोपाचे २६ आणि २७ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूमधील चाणक्य हॉल मध्ये होणार आहे. नुक्कड कॅफे तर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध चर्चासत्रे,स्टोरीटेलिंग सत्रे, एलजीबीटीक्यू समुदायातील लेखकांशी संवाद,प्रवास कथा आणि विशेष सत्रे यांचा समावेश असेल.

 

या उपक्रमाला पुणे महानगरपालिका,एनएचआरडी पुणे चॅप्टर,एमआयटी डब्ल्यूपीयू, अमर चित्र कथा,ग्योथं इन्स्टिट्युट,किताबी चाय, राह,को-क्रिएटर्स अ‍ॅन्ड कंपनी,राह,कहानी,रेन्बो फीज कॅफे यासारख्या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

 

26 एप्रिल रोजीच्या कार्यक्रमात आपली पुस्तके स्वप्रकाशित केलेल्या लेखकांसोबत दुपारी 4 ते 8 या वेळेत विविध चर्चासत्र आणि त्यानंतर झैनाब चिनीकमवाला या दृष्टिहीन वाचकाचे कथाकथन सत्र होणार आहे.

 

27 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात दुपारी 3 ते 5 या वेळेत विशेष सत्रे,संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत रेनबो स्टोरीज – आर. राजा राव (एलजीबीटीक्यू विषयावर कवितेचे पुस्तक प्रकाशित करणारे भारतातील पहिले कवी) यांच्याशी संवाद होणार असून आणि त्यांच्या दोन नवीन पुस्तकांचे प्रकाशन पार पडणार आहे.त्याचबरोबर राहुल शिंदे यांच्याशी संवाद होणार असून दोन्ही लेखक कवितावाचन सादर करतील. संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत इंस्पिरेशनल स्टोरीज- कॅन्सर वर मात करणाऱ्या लेखिका विभा राणी आणि दिव्यांग लेखक रचित कुलश्रेष्ठ यांच्याशी संवाद होणार आहे. संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत दृष्टिहीन लोकांसाठी डिजिटल लायब्ररीवरील आणि त्याचा त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम या विषयावर सत्र पार पडणार आहे. आणि रात्री 8 ते 9 दरम्यान प्रवासातील गाणी आणि मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडेल.

 

आयोजक आणि नुक्कड कॅफेचे मालक वैभव पालीवाल, म्हणाले की, पुणे वर्ल्ड बुक डे उपक्रम हा बदलत्या युगांचे आणि विकसित होणाऱ्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारा एक प्रकारचा पुस्तक उत्सव आहे. पुण्यातील जागतिक पुस्तक दिन कार्यक्रम लोकांना त्यांच्या कथा सांगण्यासाठी, भिन्न दृष्टिकोन शोधण्यासाठी आणि वाचनाची आवड जोपासण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून लिखित शब्दाचा सन्मान करणारा उपक्रम आहे.

 

या कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य आहे, अधिक माहितीसाठी 7798578140/ 9422517939 वर संपर्क साधा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments