Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

*

 

पुणे, दि. २४: जिल्ह्यातील ३३-मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.

 

निवडणूक निरीक्षक म्हणून बुदीती राजशेखर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०४ असा आहे. श्री. राजशेखर यांचा संपर्क क्रमांक ९६९९७१३६७४ असा असून निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी आनंद कटके यांचा संपर्क क्रमांक ९८६०३६५५६६ असा आहे.

 

निवडणूक निरीक्षक मावळ लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments