Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*विविध रंगछटांतून साकारले 'आर्ट मॅजिक'* *आर्ट मॅजिक संस्थेतर्फे ‘आर्ट मॅजिक २०२४’...

*विविध रंगछटांतून साकारले ‘आर्ट मॅजिक’* *आर्ट मॅजिक संस्थेतर्फे ‘आर्ट मॅजिक २०२४’ चित्रकला प्रदर्शन ; चित्रकार महालक्ष्मी पवार आणि अंबादास पवार यांच्यातर्फे आयोजन

 

 

पुणे : विविध ऋतूतील निसर्गाच्या रंगछटा, प्राण्यांचे पक्ष्यांचे हुबेहूब हावभाव, देवदेवता, व्यक्तिचित्र, कार्टून, विविध देशातील पर्यटन स्थळे अश्या चित्रांतून रंगाची जादू कॅनव्हासवर रेखाटत बालगंधर्व कलादालनात आर्ट मॅजिक कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात एकूण १२० चित्रांचा समावेश असून ४० हून अधिक कलाकारांनी प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.

 

आर्ट मॅजिक संस्थेतर्फे ‘आर्ट मॅजिक २०२४’ या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार मुकीम तांबोळी व चंद्रशेखर कुमावत उपस्थित होते. महालक्ष्मी पवार आणि अंबादास पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

 

अनुजा गुर्जर, ईश्वरी मते, यज्ञेश हरिभक्त, तनया गडाळे, रोहित काळे, आदिती काशीद, नीरज शहा, इशिता शहा, श्लोक चव्हाण, वेदांत अवघडे, सान्वी खळदकर, श्लोका धुमाळ, ऋचा पोतदार, शौनक चव्हाण वाघोलीकर, लावण्या गायकवाड यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे. आर्ट मॅजिक संस्थेचे हे १७ वे चित्रप्रदर्शन आहे.

 

लहान मुलांपासून मोठ्यांनी काढलेली विविध चित्रे पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनात व्यक्तीचित्र, पक्षी, प्राणी, जहाज, बोट, समुद्रकिनारा, विविध देशातील पर्यटन स्थळे अशा विविध चित्र साकारलेली प्रदर्शनात प्रामुख्याने ऍक्रेलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग, कलर पेन्सिल, ट्राय पेस्टल तसेच रेझीन आर्ट, चारकोल, पर्स्पेक्टिव्ह या माध्यमातून रेखाटलेल्या चित्रांचा समावेश प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

 

महालक्ष्मी पवार म्हणाल्या, पाच वर्षाच्या मुलापासून साठ वर्षांच्या चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनात आहेत, हे या प्रदर्शनाचे वेगळेपण आहे. ऍक्रेलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग, कलर पेन्सिल, ट्राय पेस्टल तसेच रेझीन आर्ट, चारकोल, पर्स्पेक्टिव्ह या माध्यमातील विविध चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन शुक्रवार, दिनांक २३ एप्रिल पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments