Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयास निवडणूक निरिक्षक यांची भेट

पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयास निवडणूक निरिक्षक यांची भेट

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने बुदिथी राजशेखर यांची निवडणूक निरिक्षक म्हणुन नेमणूक केलेली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन दाखल करण्याचा आज अतिंम दिवस असल्याने यावेळी निवडणूक निरिक्षक यांनी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रकियेची समक्ष पाहणी केली. त्यानंतर पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदान यत्रांचे स्ट्रॉंगरूम ची पाहणी केली तसेच सुरक्षितता व सीसीटिव्ही कार्यप्रणालीची पाहणी केली. तसेच पिंपरी विधानसभा कार्यालयातील सर्व कक्षांमार्फत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चालत असणा-या कामकाजाची पाहणी केली. यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, अति.सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, निरिक्षक समन्वयक आनंद कटके, प्रमोद ओंभासे, नायब तहसीलदार प्रविण ढमाले, मिडिया सेलचे विजय भोजने यांचेसह पिंपरी मतदारसंघाचे सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments