भारत, २२ एप्रिल २००४ : ‘गेम्स24×7 फाऊंडेशन’ या ‘गेम्स24×7’ या कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेने आज ‘व्हील्स ऑफ चेंज’ या आपल्या प्रमुख उपक्रमाच्या विस्ताराची घोषणा केली. या उपक्रमाद्वारे ही संस्था मुलांना क्रिकेट सामन्याचा थरार पाहण्याची अनोखी संधी देणार देणार आहे, तसेच त्यांच्यात सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरणाची भावना रुजविणार आहे. ‘गेम्स24×7’ ही कंपनी वैज्ञानिक आणि नाविन्यपूर्ण स्वरुपाचा ऑनलाइन स्किल-गेमिंग प्लॅटफॉर्म सादर करणारी भारतातील वापरकर्ता-केंद्रित कंपनी आहे.
‘व्हील्स ऑफ चेंज’ या उपक्रमांतर्गत ‘गेम्स24×7 फाऊंडेशन’ भारतीय ६ शहरांमधील स्वयंसेवी संस्था व क्रीडा अकादमींसोबत सहभागी होऊन तरुणांना आणि वंचित पार्श्वभूमी असलेल्या होतकरू खेळाडूंना समृद्ध करणारे अनुभव प्रदान करेल. टाटा आयपीएलच्या संपूर्ण मालिकेच्या दरम्यान काही उल्लेखनीय स्वयंसेवी संस्था व अकादमी यांच्यातील साठहून अधिक होतकरू तरुण विद्यार्थी टाटा आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्याच्या उत्साही वातावरणाचा अनुभव घेऊ शकतील. या संस्थामध्ये होप कोलकाता फाऊंडेशन, लखनौमधील पठाण अकादमी, जयपूरमधील अरावली क्रिकेट अकादमी, अहमदाबादमधील जेसीएच क्रिकेट अकादमी, चेन्नईमधील व्हिक्टरी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि हैदराबादमधील स्पोर्ट्स कोचिंग फाऊंडेशन यांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ‘माय11सर्कल’ हा ‘गेम्स24×7’चा फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म पुढील पाच वर्षांसाठी या आयपीएलचा सहयोगी भागीदार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना ‘गेम्स24×7’चे सह-संस्थापक आणि सह-मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पंड्या म्हणाले, “गेम्स24×7 फाऊंडेशन ही संस्था देशातील तरुणांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक संसाधने व संधी उपलब्ध करून देऊन उज्ज्वल भविष्याची आकांक्षा बाळगण्यासाठी अर्थपूर्ण मदत करते. आमचा विश्वास आहे की हा केवळ संस्मरणीय अनुभव नसून, तो सर्वसमावेशक अनुभव असेल आणि सामना सुरू असताना आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहणाऱ्या मुलांमध्ये स्वतःविषयी जिद्दीची भावना निर्माण करणाराही असेल. सामन्यात यश मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या आणि जय-पराजय सहजपणे स्वीकारणाऱ्या क्रिकेटपटूंची जिद्द आणि उत्कटता ही मुले पाहतात. त्यातून त्यांना स्वतःचे ध्येय निश्चित करण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि यश व अपयश या दोन्ही गोष्टी नम्रतेने हाताळण्याची प्रेरणा मिळते.”
‘गेम्स24×7 फाउंडेशन’चा ‘व्हील्स ऑफ चेंज’ हा उपक्रम उद्याच्या पिढ्यांसाठी कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. गेल्या जानेवारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या, या उपक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील दुर्गम जिल्ह्यांतील मुलींना १००० सायकली देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. या मुलींना उच्च शिक्षण घेण्याच्या वाटचालीत या सायकलींची मदत होणार आहे.
‘गेम्स24×7 फाउंडेशनच्या’ पालक संस्थेला कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन (केएससीएफ), हेमकुंत फाऊंडेशन, क्रिस्टल हाऊस आणि इतर अनेक ना-नफा संस्थांचे सहकार्य लाभलेले आहे. कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशनसोबत ‘गेम्स24×7’ने मुलांची तस्करी करण्याच्या गुन्ह्यांवर एक अभ्यास केला होता. या अभ्यासाचा उपयोग केएससीएफ व तिच्या इतर भागीदारांना असुरक्षित मुलांकडून गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी एक साधन म्हणून पुढे झाला. अशा उपक्रमांतून देशभरातील असंख्य नागरिकांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवण्याचा पाया घातला
जातो.


