Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिस्सानने देशभरातील ग्राहकांसाठी राबवतंय एसी तपासणी अभियान

निस्सानने देशभरातील ग्राहकांसाठी राबवतंय एसी तपासणी अभियान

निस्सानने १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत त्यांच्या १२० सर्व्हिस वर्कशॉपमध्ये मोफत एसी चेकअपचे अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.

सर्व ग्राहकांना लेबर चार्जवर २० टक्क्यांपर्यंत आणि व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसवर १० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

 

गुरुग्राम, भारत (एप्रिल २६, २०२४)- निस्सान मोटर्सने त्यांच्या ग्राहकांसाठी पुढचे दोन महिने मोफत एसी तपासणी अभियान राबवत असल्याची घोषणा केली आहे ग्राहक आणि उत्कृष्ट सेवेप्रति निष्ठेचे हे आणखी एक उदाहरण आहे. देशातील सर्व अधिकृत सर्व्हिस वर्कशॉपमध्ये १५ एप्रिल ते १५ जून 2024 या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार असून सर्व ग्राहकांसाठी ही सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध असेल. निस्सानचे प्रशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञ हे काम निस्सानचे स्पेअर पार्ट्स वापरून करतील आणि त्याजोगे उत्कृष्ट सेवेची हमी देतील.

 

निस्सान आणि डॅटसन गाड्यांचे मालक या सेवेसाठी निस्सान वन या अॅप द्वारे किंवा निस्सान मोटर इंडियाच्या वेबसाईटवरून ((www.nissan.in) अपॉइंटमेंट घेऊ शकतील. या उपक्रमामुळे निस्सानप्रति असलेला ग्राहकांचा विश्वास दृढ होईल आणि विनाअडथळा सेवा देण्याच्या निस्सानची हमी याचा ग्राहकांना अनुभव घेतील. हे कॅम्प निस्सान आणि डॅटसन ब्रँडच्या देशातील 120 सर्व्हिस वर्कशॉपमध्ये घेण्यात येतील.

 

या कॅम्पमध्ये २० पॉइंट चेकअपचा समावेश असेल. पिरिऑडिक मेन्टेनन्स सर्व्हिस घेणाऱ्या ग्राहकांना कार टॉप वॉश, फ्री पिक अप आणि ड्रॉपची सेवा उपलब्ध असेल. तसंच ग्राहकांना कारच्या वेगवेगळ्या भागांवर आणि अॅक्सेसरीजवर सूट मिळेल. ही सूट डीलर ठरवेल. तसंच लेबर चार्जेसवर २० टक्के सूट आणि व्हॅल्यू अडेड सर्व्हिसेस वर १० टक्क्यांची सूट मिळेल. गाडीचा परफॉरमन्स टिकून राहण्यासाठी आणि गाडी अधिकाधिक टिकण्यासाठी या सर्व ऑफर्सचा ग्राहकांनी फायदा घ्यावा आवाहन कंपनीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments