Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदारांना मतदार यादीतील नाव शोधणेकामी Voters Help Desk ची स्थापना

मतदारांना मतदार यादीतील नाव शोधणेकामी Voters Help Desk ची स्थापना

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे पार्श्वभूमीवर मतदार यादीत नाव सापडत नसलेबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने, सदर मतदारांना मतदानाचे दिवशी मतदार यादीतील नाव शोधणे सहज शक्य होईल याकरिता मा.डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत Voters Help Desk तयार करुनि ERO Net प्रणालीवर कामकाज करणा-या ०२ कर्मचा-यांची नेमणूक करणेकामी कळविले होते.

 

त्यानुसार ३३ मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघाकडील Voters Help Desk च्या कामकाजासाठी श्री.अनिल कुदळे, मुख्य लिपिक, (मो.क्र.९९२२५३५२३४) व श्री.अमर कांबळे, कॉम्प्युटर ऑपरेटर (मो.क्र.९५२७५१४८०५) यांची नेमणूक करणेत आलेली आहे. तरी २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार यांना आवाहन करण्यात येते की, या सुविधेचा वापर करुन आपले मतदान केंद्र माहिती करुन मतदानाच्या दिवशी मतदान करुन लोकशाहीच्या उत्सव पर्वामध्ये सहभागी व्हावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments