पुणे, दि. २६: जिल्ह्यातील ३६-शिरूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.
निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून श्रीमती जया गौरी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०६ असा आहे. जया गौरी यांचा संपर्क क्रमांक ९३०९३२७५८७ व ०२०-२९९९७४०० तसेच ई मेलआयडी shirurpoliceobserver@gmail.com असा आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी स्नेहल गुरव यांचा संपर्क क्रमांक ८८०५४४४६०० असा आहे. जया गौरी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत भेटतील, असे शिरूर लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
000


