Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedधंगेकरांच्या पूर्व भागातील पदयात्रेत जे सी पीतून फुलांचा वर्षाव

धंगेकरांच्या पूर्व भागातील पदयात्रेत जे सी पीतून फुलांचा वर्षाव

कसबा विधानसभा मतदार संघाची पदयात्रा महात्मा फुले स्मारकापासून सुरु झाली.आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जीप यात्रा आयोजित केल्या जायच्या या लोकसभा निवडणुकीत उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी मात्र सर्वत्र पायी चालत पदायात्रेतून नागरिकांशी संवाद साधला ही विशेष बाब मानवी लागेल. ही पदयात्रा शहराच्या पूर्व भागात झगडे आळी, घोरपडे पेठ पोलीस चौकी, घसेटी पुल, कस्तुरे चौक, मोमीनपुरा, काची आळी, सुभानशा दर्गा, शितळा देवी चौक, गाडीखाना, पानघंटी चौक, राष्ट्रभुषण चौक मार्गे खडकमाळ आळी येथे समाप्त झाली.

 

 

 

या पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल – ताशा सर्व पक्षांचे झेंडे, फटाक्यांचा धुमधडाका आणि जयघोषाच्या घोषणा अशा वातावरणात उमेदवार रवींद्र धंगेकर मार्गावरील शेकडो नागरिकांना भेटत होते. अनेक सार्वजनिक गणेश मंडळात त्यांनी श्री गणेशाची आरती केली, काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजा पदायत्रेत ठिकठिकाणी उंचावला जात होता विशेष म्हणजे घोरपडे पेठ पोलीस चौकी येथे हेमंत राजभोज आणि शाबीर खान यांनी जे सी पी मधून रवींद्र धंगेकरांवर फुलांचा वर्षाव केला. त्यावेळी टाळ्यांच्या कडकडाटामुळे वातावरण भरून गेले होते. मार्गावरील अनेक मंदिरे व प्रार्थना स्थळांना धंगेकरांनी भेट देऊन दर्शन घेतले. राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक असणाऱ्या शहराच्या पूर्व भागात धंगेकरांना मोठा परतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

 

 

 

या पदयात्रेत उमेदवार आमदार धंगेकरांसोबत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर कमाल व्यवहारे, काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, नेहरू स्टेडीयम ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, शाबीर खान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गणेश नलावडे, संदीप गायकवाड, सुमित डांगे, निलेश बोरवडे, गणेश भंडारी, सागर कांबळे, शैलेश आंदेकर, रुपेश पवार, आयुब पठाण, रवी पाटोळे, सईद सय्यद, सौरव आमराळे, विक्रम खन्ना आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments