Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदौंड येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे...

दौंड येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ३० : सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाअंतर्गत नव्याने सुरू झालेल्या दौंड येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते ८ वी इयत्तेची प्रवेश प्रक्रिया सूरू झाली असून अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रर्वग २ टक्के आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा आरक्षित आहेत.

 

प्रवेशासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थी नोंद पत्रिका, विद्यार्थ्यांचे व पालकांची चार रंगीत छायाचित्रे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 

शाळेत डिजिटल अध्यापन सुविधा, सायन्स पार्क, सेमी इंग्रजी माध्यम, मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व सुसज्ज इमारत, विविध खेळ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय, ई ग्रंथालय आदी सोयी सुविधा असून दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा मेळावा व सहलीचे आयोजन करण्यात येते.

 

अधिक माहितीसाठी मुख्याद्यापक मुलांची निवासी शाळा, दौंड, भ्रमणध्वनी क्रमांक ९७६२९६९९५५ वर इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहनही शाळेचे मुख्याद्यापक एम. एम. वाघमारे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments