Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदौंड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

दौंड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

 

 

बारामती, दि. ३०: मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी दौंड येथील स्व. किसन गुलाबचंद कटारिया महाविद्यालय, शेठ जोतीप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मतदार जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

दौंड विधानसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमाअंतर्गत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१९ साली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी मध्ये कमी मतदान झालेल्या मतदान केंद्र परिसरात मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत मतदार जागरूकता अभियान कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून मतदान संकल्पपत्र घेण्यात आले. तसेच लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होऊन येत्या ७ मे रोजी अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

 

यावेळी स्वीप समन्वयक तथा एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ, सहाय्यक नोडल अधिकारी शशिकांत लोणकर, किसन गुलाबचंद कटारिया महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष समुद्र, शेठ जोतीप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव लोणकर, दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर जंगले व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments